नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय होणार बदल; WhatsApp ने दिली माहिती

नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय होणार बदल; WhatsApp ने दिली माहिती

व्हॉट्सअ‍ॅपच्या या धोरणानं मित्र आणि कुटुंबीयांसह वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचा व्हॉट्सअ‍ॅपकडून खुलासा करण्यात आला आहे. त्यानंतर आता कंपनीकडून यासंदर्भात युजर्सना याचा काहीही तोटा होणार नसल्याचं समजावून सांगितलं जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : व्हॉट्सअ‍ॅपनं (WhatsApp) काही दिवसांपूर्वी नवीन प्रायव्हसी पॉलिसी (WhatsApp privacy policy) आणली होती. यामध्ये सामान्य नागरिकांची प्रायव्हसी धोक्यात येणार असल्याच्या चर्चेने सामान्यांनी धसका घेतला आहे. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या या धोरणानं मित्र आणि कुटुंबीयांसह वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचा व्हॉट्सअ‍ॅपकडून खुलासा करण्यात आला आहे. त्यानंतर आता कंपनीकडून यासंदर्भात युजर्सना याचा काहीही तोटा होणार नसल्याचं समजावून सांगितलं जात आहे. ही नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर खूप बदल होणार नसल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात येत आहे.

या नवीन पॉलिसीनंतर काय बदलणार नाही

- ही नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर युजर्सचा डेटा कोणत्याही पद्धतीनं लीक होणार नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. हा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार असल्यानं फेसबुक किंवा व्हाट्सअ‍ॅप तो पाहू शकणार नाहीत.

- व्हॉट्सअ‍ॅप बिजनेसमध्ये देखील कंपनी कोणत्याही प्रकारे ग्राहकांचा डेटा कंपन्यांना पुरवणार नाही. युजर्सच्या संमतीशिवाय कोणत्याही पद्धतीनं कंपनी त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही.

- आपला क्रमांक कुणाला द्यायचा आहे कि नाही हे तुम्ही ठरवणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. याचबरोबर कोणत्याही बिजनेस अकाउंटला तुम्ही ब्लॉक करू शकता.

- आपल्या प्लॅटफॉर्मवर कंपनी कधीही थर्ड पार्टीला जाहिरात लावण्याची परवानगी देत नाही. परंतु भविष्यात कंपनीने असा निर्णय घेतला, तर प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

(वाचा - Alert!वेळीच सावध व्हा;सेटिंग्जमध्ये करा हे बदल,WhatsApp अकाउंट हॅक होण्याचा धोका)

- आपल्या स्वीकृतीच्या नवीन अटी आणि सेवेसाठी व्हॉट्सअ‍ॅप आपली मूळ कंपनी फेसबुकवर युजरचा डेटा शेअर करण्याची क्षमता वाढवत नसल्याचं देखील म्हटलं आहे.

काय बदल होणार?

- ईमेलच्या तुलनेत अधिक वेगाने काम करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या बिजनेस अकाउंटचा वापर करू शकता.

- कंपनीने हे पूर्णपणे पर्यायी असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर कंपनी कोणत्याही ब्रँडबरोबर किंवा कंपनीबरोबर युजर्सचा नंबर शेअर करत नाही.

- फेसबुकवर या जाहिराती पाहण्यासाठी क्लिक केल्यास तुम्ही पाहिलेल्या जाहिरातींचा डेटा हा पर्सनलाइज्ड केला जाऊ शकतो. यावरील मेसेज हे एंड-टु-एंड एन्क्रिप्टेड असल्याने फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप हे पाहू शकत नाहीत.

- यापुढे युजर्सला हे अ‍ॅप वापरायचं असल्यास युजर्सला नवीन पॉलिसीचा स्वीकार करावा लागणार आहे. जर 15 मे पर्यंत या नवीन पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकणार नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: February 23, 2021, 8:22 AM IST

ताज्या बातम्या