मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp चं नवं Security Update, App मध्ये काय बदल होणार?

WhatsApp चं नवं Security Update, App मध्ये काय बदल होणार?

सिक्योरिटीच्या दृष्टीने WhatsApp ने नवं अपडेट जारी (WhatsApp New Security Update) केलं आहे. सध्या हे टेस्टिंगमध्ये असून लवकरच सर्व युजर्ससाठी लाँच होऊ शकतं.

  नवी दिल्ली, 28 मार्च : WhatsApp जगभरातील सर्वात पॉप्युलर मेसेजिंग App आहे. फोटो, व्हिडीओ, ऑडिओ कॉल, व्हिडीओ कॉल, फाइल्स, पेमेंट अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे अपडेट्स देत असतं. आता सिक्योरिटीच्या दृष्टीने WhatsApp ने नवं अपडेट जारी (WhatsApp New Security Update) केलं आहे. सध्या हे टेस्टिंगमध्ये असून लवकरच सर्व युजर्ससाठी लाँच होऊ शकतं. WABetaInfo ने दिलेल्या एका नव्या रिपोर्टनुसार, WhatsApp एक नवं Update घेऊन येत आहे, ज्यात एक नवं सेफ्टी फीचर दिलं जाईल. या Update मुळे WhatsApp 2.22.8.7 वर्जनपर्यंत पोहोचेल. हे नवं अपडेट Google Play Beta Program द्वारे आणलं जात आहे. या अपडेटमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-to-End Encryption) बाबत एक अॅडिशन केलं जात आहे.

  हे वाचा - आता कॉलआधी ऐकू येणार नाही कोरोना Caller Tune, पाहा काय आहे सरकारचा प्लॅन

  या अपडेटमुळे WhatsApp मध्ये काय बदल होणार? या अपडेटमुळे व्हॉट्सअॅपमध्ये काही बदल होतील. WABetaInfo ने या नव्या अपडेटचं नाव एंड-टू-एंड इन्डिकेटर्स (End-to-End Indicators) असल्याचं म्हटलं आहे. या अपडेटमुळे युजरला त्यांच्या कॉल लॉग पेजमध्ये सर्वात खाली एक महत्त्वाची सूचना दिसेल. युजरचे फोन कॉल्स एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहेत आणि WhatsApp किंवा Meta ते ऐकू शकत नाही असं त्या सूचनेमध्ये लिहिलेलं असेल. हीच सूचना लवकरच चॅट्स आणि स्टेटस अपडेट पेजसाठीही जारी केली जाईल अशीही माहिती आहे.

  हे वाचा - आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार! वाचा तुम्हाला कधी मिळणार नवीन फिचर

  WhatsApp चं हे Update सध्या केवळ WhatsApp Beta युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. हे Update iPhone किंवा इतर युजर्ससाठी कधी जारी केलं जाईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसंच WhatsApp साठीही या अपडेटबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp messages, Whatsapp New Feature

  पुढील बातम्या