मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता कॉलआधी ऐकू येणार नाही कोरोना Caller Tune, पाहा काय आहे सरकारचा प्लॅन

आता कॉलआधी ऐकू येणार नाही कोरोना Caller Tune, पाहा काय आहे सरकारचा प्लॅन

टेलिकॉम कंपन्यांकडून (Telecom Companies) कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यासाठी फोनवर ऐकू येणारी घोषणा अर्थात कॉलर ट्यून लवकर इतिहासजमा होऊ शकते.

टेलिकॉम कंपन्यांकडून (Telecom Companies) कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यासाठी फोनवर ऐकू येणारी घोषणा अर्थात कॉलर ट्यून लवकर इतिहासजमा होऊ शकते.

टेलिकॉम कंपन्यांकडून (Telecom Companies) कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यासाठी फोनवर ऐकू येणारी घोषणा अर्थात कॉलर ट्यून लवकर इतिहासजमा होऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सुरुवातीच्या काळात लोकांना याबाबत जागरुक करण्यासाठी मोबाइल फोनवर कॉलर ट्यूनद्वारे (Corona Caller Tune) सुरक्षेच्यादृष्टीने माहिती दिली जात होती. टेलिकॉम कंपन्यांकडून (Telecom Companies) कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यासाठी फोनवर ऐकू येणारी घोषणा अर्थात कॉलर ट्यून लवकर इतिहासजमा होऊ शकते. जवळपास दोन वर्ष ही कॉलर ट्यून सतत मोबाइलवर ऐकू येत होती. आता दोन वर्षांनी सरकार ही कॉलर ट्यून हटवण्याचा विचार करत आहे.

ज्या उद्देशाने कोरोना कॉलर ट्यून सर्व मोबाइलवर वाजवण्यात येत होती, त्याचा उद्देश आता पूर्ण झाला आहे. सरकारकडे अनेकांनी ही कॉलर ट्यून बंद करण्याबाबत अर्ज केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या कॉलला विलंब होत असल्याचं या अर्जात सांगण्यात आलं आहे. या कॉलर ट्यूनमुळे आपत्कालीन काळात महत्त्वाचे कॉल्स होल्ड होण्याचा, कॉलला विलंब होण्याचा धोका असतो. यामुळे TSP नेटवर्कवरील भार वाढतो आणि कॉल कनेक्शनला उशीर होतो. त्यामुळेच आता कोरोना परिस्थिती सुधारत असताना ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची मागणी होत आहे.

हे वाचा - आनंद महिंद्रांनाही या Treadmill ची भूरळ, VIDEO शेअर करत केलं अनोख्या कलेचं कौतुक

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाने (DOT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून या कॉलआधीच्या घोषणा, कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

देशात कोरोना परिस्थितीत झालेली सुधारणा लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून आता ही ऑडिओ क्लिप काढून टाकण्यावर विचार सुरू आहे. परंतु या कॉलर ट्यूनशिवाय कोरोनाविरोधातील इतर सुरक्षेच्या उपायांबद्दल जगजागृती करण्यासाठी इतर उपाययोजना सुरू राहतील अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

हे वाचा - रस्त्यावरुन सर्व Toll Plaza हटवले जाणार, भारत सरकारचं मोठं पाऊल; नितीन गडकरींनी दिली माहिती

टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडरकडून लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी, साथीच्या आजारादरम्यान घ्यायची काळजी, लसीकरण याबाबत माहिती देण्यासाठी कॉलआधी कोरोनासंबंधित कॉलर ट्यून वाजवली जात होती. जवळपास 21 महिने ही कॉलर ट्यून सुरू आहे. या कॉलरचा ट्यूनचा लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उद्देशही पूर्ण झाला असून आता याचा वापर बंद करण्याबाबत दूरसंचार विभागाने आरोग्य मंत्रालयाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Telecom companies, Telecom service