Home /News /technology /

लॉकडाऊनमध्ये हॅकिंगची भीती वाढली, WhatsAppच्या सुरक्षेसाठी त्वरित वापरा हे फीचर

लॉकडाऊनमध्ये हॅकिंगची भीती वाढली, WhatsAppच्या सुरक्षेसाठी त्वरित वापरा हे फीचर

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सएपच्या क्लिक टू चॅट फीचरमुळे हा गोंधळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सएपच्या क्लिक टू चॅट फीचरमुळे हा गोंधळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

स्पायवेअर संबंधातील अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेवणं गरजेचं बनलं आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : देशात 3 मेपर्यंत कोरोना व्हायरस (Coronavirus)मुळे लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. अशावेळी घराबाहेर पडायला मिळत नसल्यामुळे अनेकजण आपला बराचसा वेळ लॅपटॉप, कम्प्यूटर्स, मोबाइल किंवा टॅब्सवर घालवत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर सुद्धा आपल्या प्रियजनांशी बोलण्यात अनेकांचा दिवस निघून जात आहे. मात्र याचा फायदा हॅकर्सकडून घेतला जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्पायवेअर संबंधातील अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेवणं गरजेचं बनलं आहे. त्यामुळे WhatsApp कडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अनेक सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यांचा तुम्ही वापर करणे गरजेचं आहे. जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपचे सिक्युरिटी फीचर्स 1. WhatsApp अकाउंट सुरक्षितपणे वापरण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन (two-step verification) फीचरचा वापर करणे आवश्यक आहे. हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमधील डेटा सुरक्षित राहण्यास मदत होईल. 2. हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर जर तुम्ही फोन रिसेट केलात किंवा सिम कार्ड बदललात तर पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉग इन करण्यासाठी एक पासकोड मागितला जातो. (हे वाचा-Vodafone-idea चा ग्राहकांना दणका, लॉकडाऊनमध्ये दिलेल्या रिचार्ज ऑफरमध्ये बदल) 3. टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी WhatsApp च्या सेटिंग्समध्ये जा. याठिकाणी अकाउंट सेक्शनमध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन पर्याय असेल तो enable करा. यानंतर तुम्हासा 6 अंकाचा PIN टाकावा लागेल. 4. PIN कन्फर्म झाल्यानंतर WhatsApp  तुम्हाला एक मेल आयडी टाकण्यास सांगेल. मेल आयडी अ‍ॅड यासाठी करायचा जेणेकरून जर भविष्यात तुम्ही तुमचा पिन विसरलात तर तो रिसेट करण्यासाठी त्याचा वापर करता येईल. 5. लक्षात ठेवा की मेल आयडी देताना योग्य मेल आयडी द्या कारण व्हॉट्सअ‍ॅप मेल आयडी कन्फर्म करत नाही. त्यामुळे जर तुम्ही चुकीचा मेल आयडी टाकलात तर पिन विसरल्यास तो रिसेट करता येणार नाही. मात्र हा मेल आयडी द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता. गरज न वाटल्यास हा पर्याय तुम्ही स्कीप करू शकता. (हे वाचा-LockDown मध्ये 'गूगल पे'ची खास सेवा, घरातून बाहेर पडण्याआधी चेक करा) 6. व्हॉट्सअ‍ॅपचे फिंगरप्रिंट फीचर- हे फीचर वापरून तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप फिंगरप्रिंटने सुरक्षित ठेवू शकता. सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसीच्या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी अगदी शेवटी असणाऱ्या फिंगरप्रिंट लॉकच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हे फीचर देखील अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Whatsapp

    पुढील बातम्या