जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / LockDown मध्ये 'गूगल पे'ची खास सेवा, अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्याआधी चेक करा

LockDown मध्ये 'गूगल पे'ची खास सेवा, अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्याआधी चेक करा

LockDown मध्ये 'गूगल पे'ची खास सेवा, अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्याआधी चेक करा

गुगलने लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांसाठी Nearby Spot लाँच केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगातील लोकांच्या दैनंदिन जीवनासह उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. भारतात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अजूनही कोरोना वाढत असल्याने हा लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. आता गुगलने लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांसाठी Nearby Spot लाँच केलं आहे. गूगल पे च्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे. यामध्ये स्थानिक भागात जवळपास सुरू असलेली किराणामालाची दुकाने आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने यांची माहिती मिळणार आहे. सध्या बेंगळुरूत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा हैद्राबाद, चेन्नई, मुंबई, पुणे आणि दिल्लीत दिली जाणार आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमामुळे डिजिटल पेमेंट महत्वाचे ठरते आहे. गूगल पे आता यामध्येच डिजिटल पेमेंटशिवाय लोकांना कोरोनाच्या संकटकाळात मदतीसाठी पुढे आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेबद्दलच नाही तर देशाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येणारी माहितीसुद्धा गूगल पे देत आहे. PM CARES fund, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासह इतर मदतीसाठी COVID 19 SPOT तयार केला आहे. हे वाचा : कपल्सचं खाजगी बोलणं असो वा ऑफिसची मीटिंग, कोणतं App व्हिडीओ कॉलसाठी सुरक्षित? गूगल पेवरून PM CARES मध्ये 105 कोटी रुपये लोकांनी जमा केले आहेत. गुगलने योग्य आणि अचूक माहिती भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही पावले उचलली आहेत. त्यामध्ये अधिकृत माहिती देणे, सध्याच्या काळात उपयोगी पडेल अशी माहिती देण्यावर कंपनी भर देत आहे. भारतात आतापर्यंत एकूण 9 हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी दिवसभरात 35 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा : पॉर्न साइटवर बंदी असून पाहण्यात भारतीय जगात अव्वल, Lockdown मध्ये प्रमाण वाढलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात