मुंबई, 20 एप्रिल : टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने लॉकाडाऊनच्या काळात त्यांच्या ग्राहकांसाठी दिलेली डबल डेटा सर्व्हिस बंद केली आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. देशातील आठ सर्कलमधील डबल डेटा ऑफरचे प्लॅन बंद केले आहेत. कंपनीने गेल्याच महिन्यात 249, 399 आणि 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डेटाची ऑफर दिली होती. यानुसार दीड जीबी डेटा मिळत होता त्याऐवजी तीन जीबी डेटा ग्राहकांना दिला होता.
रिपोर्टनुसार व्होडाफोन-आयडियानं आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा, नॉर्थ इस्ट, पंजाब, उत्तर प्रदेशात त्यांच्या डबल डेटाची ऑफर बंद केली आहे. यामुळे 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारा तीन जीबी डेटा आणि दररोज दीड जीबी मिळणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये इतर सुविधा पहिल्याप्रमाणेच मिळतील. यात अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि व्होडाफोन प्ले, झी5 अॅप चा समावेश आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांसाठी आहे.
हे वाचा-Appleचा सर्वात स्वस्त iPhone SE 2020 लॉन्च, वाचा काय आहे किंमत आणि फीचर्स
डबल डेटा ऑफरमध्ये 399 रुपयांमध्येही 3 जीबी डेटा दिला होता. आता यावरही दरदिवशी 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस मिळतील. तसंच व्होडाफोन प्ले, Zee5 या प्रिमीयम अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. 399 रुपयांचा हा प्लॅन 56 दिवसांसाठी आहे.
व्होडाफोन-आयडियाने त्यांच्या 599 च्या प्लॅनमध्येही डबल डेटा ऑफर दिली होती. मात्र आता यावरसुद्धा दीड जीबी डेटा मिळेल. तसंच अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस मिळतील. तसंच व्होडाफोन प्ले, Zee5 या प्रिमीयम अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. या पॅकची मुदत 84 दिवस इतकी होती.
हे वाचा-LockDown मध्ये 'गूगल पे'ची खास सेवा, घरातून बाहेर पडण्याआधी चेक करा
संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.