नवी दिल्ली, 15 मार्च : सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी नेहमी काही वेगळे आणि जबरदस्त फीचर्स आणत असतं. यावेळीही कंपनी काही खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या फीचरमुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर इन्स्टाग्राम रील्स पाहू शकतील. व्हॉट्सअॅप ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप नव्या फीचरवर काम करत आहे. कंपनीने अधिकृतरित्या या फीचरबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. रिपोर्टनुसार, फेसबुकने (Facebook) या फीचरसाठी टेस्टिंग सुरू केलं आहे. नवीन फीचर आल्यानंतर WhatsApp वर युजर्सला इन्स्टाग्राम रील्सचा एक टॅब मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Instagram Reels पाहता येईल.
(वाचा - WhatsApp Chat सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल )
(वाचा - Facebookसाठी वापरा या सेफ्टी टिप्स,असं करा आपलं अकाउंट सुरक्षित ) जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या फीचरसाठी युजर्सला अधिक वाट पाहावी लागणार नाही. WABetaInfo द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप लवकरच हे खास फीचर पाहता येईल. दरम्यान, WhatsApp युजर्सला व्हॉट्सअॅपकडून एक महत्त्वाचा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेजला रिमाइंडरही म्हटलं जात आहे. आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीअंतर्गत WhatsApp ने आपल्या युजर्सला नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे नोटिफिकेशन स्वीकारणं युजर्ससाठी अनिवार्य असेल. तरच भविष्यात युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करू शकतील. WhatsApp ने 15 मेपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची मुदत ठेवली आहे. युजर्सनी व्हॉट्सअॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही, तर सुरुवातीला काही दिवस युजर्स केवळ WhatsApp Call आणि नोटिफिकेशन पाहू शकतील. परंतु युजर्स कोणालाही मेसेज करू शकणार नाहीत, तसंच आलेले मेसेज वाचूही शकणार नाहीत. त्यामुळए युजर्सला 15 मेपर्यंत नवी प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट करावी लागेल, अन्यथा अकाउंट बंद होऊ शकतं.