मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत फायद्याचं आहे WhatsApp चं हे फीचर, पाहा कसं वापराल

सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत फायद्याचं आहे WhatsApp चं हे फीचर, पाहा कसं वापराल

व्हॉटसॲपच्या काही फिचर्सचा वापर आपण कमी प्रमाणात करतो किंवा अनेकदा करतही नाही. यातील असेच एक फिचर आहे ते म्हणजे लाईव्ह लोकेशन (Live Location).

व्हॉटसॲपच्या काही फिचर्सचा वापर आपण कमी प्रमाणात करतो किंवा अनेकदा करतही नाही. यातील असेच एक फिचर आहे ते म्हणजे लाईव्ह लोकेशन (Live Location).

व्हॉटसॲपच्या काही फिचर्सचा वापर आपण कमी प्रमाणात करतो किंवा अनेकदा करतही नाही. यातील असेच एक फिचर आहे ते म्हणजे लाईव्ह लोकेशन (Live Location).

नवी दिल्ली 09 जुलै : वैविध्यपूर्ण फिचर्समुळे व्हॉटसॲप (WhatsApp) हे सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप (Messaging App) आहे. सध्या या अॅपचा वापर व्यापक स्वरुपात केला जातो. मात्र यातील काही फिचर्सचा वापर आपण कमी प्रमाणात करतो किंवा अनेकदा करतही नाही. यातील असेच एक फिचर आहे ते म्हणजे लाईव्ह लोकेशन (Live Location). याचा वापर सुरक्षिततेसाठी करणे शक्य आहे. प्रामुख्याने जेव्हा तुम्ही एकटे घरापासून दूर असता, अशावेळी लाईव्ह लोकेशन तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरु शकते आणि आपत्कालीन स्थितीत यामुळे मित्र किंवा कुटुंबीयांकडून मदत मिळवणे सहज शक्य होते. व्हॉटसॲपमधील लाईव्ह लोकेशनच्या मदतीने तुम्ही रिअल टाईमच्या माध्यमातून मित्र किंवा विशिष्ट ग्रुपमध्ये लोकेशन शेअर करु शकता. यामुळे युजर्सचे लोकेशन समोरील व्यक्तीला समजू शकते.

Zomato वरुन आता किराणा मालही मागवता येणार, या सुविधेचा असा घेता येणार फायदा

असे वापरा लाईव्ह लोकेशन फिचर

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हे फिचर वापरण्यास अत्यंत सोपं आहे. हे फिचर सुरु केल्यानंतर काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. यात सर्वप्रथम तुम्हाला फोनमधील व्हॉटसॲप सुरु करावे लागेल. परंतु, व्हॉटसॲप सुरु करण्यापूर्वी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये (Setting) जाऊन व्हॉटसॲपला लोकेशन अॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागेल. यानंतर व्हॉटसॲप चॅट किंवा ग्रुप ओपन करा आणि ज्या व्यक्ती, ग्रुपसोबत तुम्हाला लोकेशन शेअर करायचे आहे, ते तुम्ही करु शकता. यासाठी तुम्हाला अॅटॅचवर टॅप करावं लागेल. त्यानंतर लोकेशनवर क्लिक करा. लोकेशनवर क्लिक केल्यानंतर लाईव्ह लोकेशन शेअर करण्याचा ऑप्शन येईल. त्यावर टॅप करा. इथे तुम्हाला किती वेळेपर्यंत लोकेशन शेअर करायचे आहे, हे निश्चित करण्यासाठी टाईम लेन्थ (Time Length) सिलेक्ट करावे लागेल. या दिलेल्या ठराविक वेळेनंतर लाईव्ह लोकेशन शेअर बंद होईल. त्यानंतर सेंडवर टॅप करुन तुम्ही लाईव्ह लोकेशन ग्रुप किंवा चॅटवर पाठवू शकता.

मोठी बातमी! नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत WhatsApp नं घेतला मोठा निर्णय

ही आहेत लाईव्ह लोकेशन फिचरची वैशिष्टे

या फिचरचे खास वैशिष्ट म्हणजे हे फिचर end-to-end encrypted आहे. याचा अर्थ तुम्ही शेअर केलेले लाईव्ह लोकेशन कोणी अन्य व्यक्ती पाहू शकणार नाही. यामुळे तुमची प्रायव्हसी (Privacy) कायम राहणार आहे. जेव्हा तुम्ही एकटे घरापासून दूर असता, तेव्हा हे फिचर विशेष उपयुक्त ठरणार आहे. अशावेळी लाईव्ह लोकेशन शेअर करुन तुम्ही तुमचे मित्र किंवा कुटुंबीयांना माहिती देऊ शकणार आहात. यामुळे तुमचे मित्र किंवा कुटुंबीय तुम्हाला सातत्याने ट्रॅक करु शकतील आणि काही आपत्कालीन स्थिती उदभवल्यास तुम्हाला तातडीने मदत करु शकतील.

First published:
top videos

    Tags: WhatsApp features, Whatsapp messages