मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता WhatsApp च्या Forwarded Messages पासून होईल सुटका, पाहा काय आहे नवं अपडेट

आता WhatsApp च्या Forwarded Messages पासून होईल सुटका, पाहा काय आहे नवं अपडेट

मागील कित्येक महिन्यांपासून WhatsApp ने अनेक फीचर्स दिले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर देत असून याचा युजर्सला मोठा फायदा होईल. या अपडेटमुळे WhatsApp च्या फॉरवर्डेड मेसेजपासून सुटका होईल.

मागील कित्येक महिन्यांपासून WhatsApp ने अनेक फीचर्स दिले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर देत असून याचा युजर्सला मोठा फायदा होईल. या अपडेटमुळे WhatsApp च्या फॉरवर्डेड मेसेजपासून सुटका होईल.

मागील कित्येक महिन्यांपासून WhatsApp ने अनेक फीचर्स दिले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर देत असून याचा युजर्सला मोठा फायदा होईल. या अपडेटमुळे WhatsApp च्या फॉरवर्डेड मेसेजपासून सुटका होईल.

नवी दिल्ली, 4 एप्रिल : WhatsApp वेळोवेळी नवे अपडेट्स देत असतं. WhatsApp च्या या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, चॅट, व्हिडीओ, फाइल शेअरिंग, ऑडिओ-व्हिडीओ कॉल, व्हॉइस कॉल, रेकॉर्डिंग अशा अनेक सुविधा मिळत असल्याने हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. मागील कित्येक महिन्यांपासून WhatsApp ने अनेक फीचर्स दिले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर देत असून याचा युजर्सला (WhatsApp Update Feature) मोठा फायदा होईल. या अपडेटमुळे WhatsApp च्या फॉरवर्डेड मेसेजपासून (Forwarded Messages) सुटका होईल.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या युजर्ससाठी WhatsApp ने एक खास अपडेट जारी केलं आहे, ज्यामुळे युजर्सची फॉरवर्ड मेसेजपासून सुटका होईल. या अपडेटमुळे एक मेसेज केवळ एकदाच एकाच ग्रुप चॅटमध्ये फॉरवर्ड करता येईल. WABetaInfo कडून मिळालेल्या स्क्रिनशॉर्ट्सनुसार, जर तुम्ही एक मेसेज एका ग्रुप चॅटमध्ये फॉर्वर्ड केला असेल, तर तो मेसेज तुम्ही दुसऱ्या चॅटमध्ये एकत्र पाठवू शकत नाही. जर एकाहून अधिक चॅट्ससाठी हा मेसेज फॉर्वर्ड करायचा असेल, तर प्रत्येक ग्रुप चॅटसाठी वेगवेगळा सिलेक्ट करावा लागेल.

सध्या हे फीचर WhatsApp ने आपल्या बीटा युजर्ससाठी जारी केलं आहे. WhatsApp beta for Android 2.22.7.2 साठी हे फीचर जारी करण्यात आलं आहे. आता हे WhatsApp beta for iPhone 22.7.0.76 साठी रोलआउट केलं जात आहे. लवकरच हे WhatsApp Update सर्व युजर्ससाठी जारी केलं जाईल.

हे वाचा - ट्रेन, बस किंवा इतर कुठेही तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कधीच पाहू शकणार नाही तुमचं WhatsApp Chat, काय आहे ट्रिक

दरम्यान, WhatsApp ने यावर्षी फेब्रुवारीदरम्यान 14.26 लाख भारतीय अकाउंट बंद केले (WhatsApp Account Banned) आहेत. अनेक तक्रारींनंतर WhatsApp ने हे पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीदरम्यान 335 भारतीय अकाउंटविरोधात तक्रारी मिळाल्या होत्या, ज्यात 194 खाती बंद करण्याचं अपील करण्यात आलं होतं. त्यापैकी 21 विरोधा कारवाई करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp chat, Whatsapp messages, Whatsapp New Feature, WhatsApp user