नवी दिल्ली, 10 मे : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp सतत आपल्या युजर्ससाठी नवे अपडेट, फीचर्स आणत असतं. आता WhatsApp एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्याचं नाव Companion मोड आहे. लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp चं हे फीचर युजरला WhatsApp ला वेगवेगळ्या फोनमध्ये Login करण्याची परवानगी देईल. हे मल्टी डिव्हाइस फीचरचं एक्सटेंशन आहे, जे काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आलं होतं अशी माहिती होती. परंतु WABetaInfo ने हे फीचर 2.22.11.10 अँड्रॉइड बीटा वर्जनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे.
शेअर करण्यात आलेल्या स्क्रिनशॉटनुसार WhatsApp लवकरच Companion Mode लाँच करेल. यामुळे युजर्स WhatsApp अकाउंटला दुसऱ्या अकाउंटमध्ये लिंक करू शकतात. स्क्रिनशॉटमध्ये दिसलेल्या माहितीनुसार, युजर्स WhatsApp दोन्ही फोनमध्ये वापर करू शकत नाहीत, कारण दुसऱ्या फोनमध्ये लॉगइन केल्यानंतर App प्रायमरी फोनमधून Logout होतं.
रिपोर्टनुसार, WhatsApp प्रायमरी डिव्हाइसमधून सर्व डेटा हटवेल. जे युजर्स आपले चॅट्स थर्ड पार्टी सर्विस सारख्या गुगल ड्राइव्ह किंवा आर्कक्लाउटवर बॅकअप घेतात, ते आपला सर्व डेटा दुसऱ्या फोनमध्ये मिळवू शकतात. सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. तसंच हे युजर्ससाठी कधीपर्यंत लाँच केलं जाईल याचीही माहिती नाही.
Reaction Feature -
WhatsApp ने मागील आठवड्यात एक रिअॅक्शन फीचर सुरू केलं आहे. WhatsApp कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुक पेजवर रिअॅक्शन फीचर सुरू झाल्याची माहिती दिली. तसंच 5 मेपासून WhatsApp Reaction Feature रोलआउट करण्यात आलं.
सध्या WhatsApp ने रिअॅक्शन फीचरमध्ये 6 इमोजी लाँच केले आहेत. परंतु पुढील येणाऱ्या काळात इतरही इमोजी दिले जातील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.