Home /News /technology /

कर्ज महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री, Car Loan चा EMI किती वाढणार? चेक करा डिटेल्स

कर्ज महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री, Car Loan चा EMI किती वाढणार? चेक करा डिटेल्स

जर तुम्ही 3 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचं लोन घेतलं आहे, तर व्याज दर वाढल्याने तुमच्या लोनचा EMI किती वाढेल? पाहा कॅल्क्यूलेशन

  नवी दिल्ली, 10 मे : सतत वाढणाऱ्या महागाईवर लगाम लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नुकतंच रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढून 4.40 टक्के केला आहे. CCR अर्थात कॅश रिजर्व्ह रेश्योदेखील 4 टक्क्यांनी वाढवून 4.50 टक्के केला आहे. रेपो रेट वाढल्याने कार लोन, होम लोन, पर्सनल लोन, ईएमआय वाढणार आहे. जर तुम्ही नवी कार लोनवर घेण्याचा विचार करत असाल, तर Car Loan EMI Calculator जाणून घेणं महत्त्वाचं तसंच फायद्याचंही ठरेल. जर तुम्ही 3 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचं लोन घेतलं आहे, तर व्याज दर वाढल्याने तुमच्या लोनचा EMI किती वाढेल? लोन अमाउंट - 5 लाख रुपये लोन कालावधी - 3 वर्ष व्याज दर - 7.35 टक्के वार्षिक EMI - 15,519 रुपये एकूण कालावधीतील व्याज - 58,673 रुपये एकूण पेमेंट - 5,58,673 रुपये दर वाढल्यानंतर संभावित EMI - लोन अमाउंट - 5 लाख रुपये लोन कालावधी - 3 वर्ष व्याज दर - 7.75 टक्के वार्षिक (0.40 टक्के वाढलेला रेट) EMI: 15,611 रुपये एकूण कालावधीतील व्याज - 61,981 रुपये एकूण पेमेंट - 5,61,981 रुपये लोन घेण्याआधी दर महिन्याला किती किंमत भरावी लागेल, EMI भरावा लागेल हे तपासणं गरजेचं आहे. यावरुन तुम्ही किती लोन घेऊ शकता हे ठरेल. EMI कॅल्क्यूलेट करताना लोनची एकूण अमाउंट, टेन्योर, टोटल रिपेंमेंट याची माहिती घेणंही महत्त्वाचं आहे. दर वाढल्याने महागणार कर्ज - रिझर्व्ह बँकेने व्याज दरात बदल केल्याने कर्जाचे दर वाढणार. अनेक बँकांनी कर्ज महागही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार लोन, होम लोन घेणं गरजेचं आहे. वाढलेल्या रेपो रेटचा कार लोन, होम लोनवर थेट परिणाम होतो. रिझर्व्ह बँकेकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढेल आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल. त्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे सर्व आगामी काळात महाग होणार आहे.

  हे वाचा - Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार

  रेपो दरवाढीचा काय परिणाम होईल? रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना कर्ज देते. म्हणजेच RBI कडून कर्ज घेतल्यावर बँकांना आता 4 टक्क्यांऐवजी 4.40 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. जेव्हा बँकांना जास्त व्याज द्यावे लागते, तेव्हा त्या ग्राहकांकडून कर्जावर जास्त घेणार. म्हणजेच रेपो रेट वाढवल्याचा परिणाम असा की, येत्या काळात सरकारपासून ते देशातील खासगी बँकांपर्यंत, गृहकर्जापासून ते कार कर्जापर्यंत, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे आणि इतर सर्वच कर्ज महाग होतील. त्यामुळे तुम्ही ज्या जुन्या कर्जावर चालत आहात त्याचा EMI देखील वाढेल. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरवाढीचा निर्णय घेतल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Loan, Rbi

  पुढील बातम्या