मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Fraud Loan App Scam: चुकूनही डाउनलोड करू नका हे App, बसेल मोठा फटका

Fraud Loan App Scam: चुकूनही डाउनलोड करू नका हे App, बसेल मोठा फटका

काही सायबर क्रिमिनल्सनी एका फ्रॉड लोन App द्वारे एका तरुणाला मोठा गंडा घातला. त्या तरुणाला इतका त्रास दिला की त्याने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

काही सायबर क्रिमिनल्सनी एका फ्रॉड लोन App द्वारे एका तरुणाला मोठा गंडा घातला. त्या तरुणाला इतका त्रास दिला की त्याने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

काही सायबर क्रिमिनल्सनी एका फ्रॉड लोन App द्वारे एका तरुणाला मोठा गंडा घातला. त्या तरुणाला इतका त्रास दिला की त्याने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली, 3 मे : सर्वच जण अनेक कामं स्मार्टफोनवरुन करतात. शॉपिंग, पेमेंट्स, बँकिंग संबंधी अशा अनेक गोष्टी करण्यासाठी ऑनलाइन Apps चा वापर केला जातो. यापैकी अनेक Apps असेही असतात, जे कामाचे तर वाटतात पण ते डाउनलोड केल्यानंतर मोठं नुकसान सहन करावं लागतं. नुकतंच एका तरुणाने एक फ्रॉड App डाउनलोड केल्याने त्याला मोठा फटका बसला आहे.

कधीही डाउनलोड करू नका असे Apps -

स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी अनेक Apps असतात. हे फ्री असल्याने सहजपणे ते डाउनलोडही करता येतात. यापैकी अनेक Apps खरे वाटतात पण ते फ्रॉड असतात. काही सायबर क्रिमिनल्सनी एका फ्रॉड लोन App द्वारे एका तरुणाला मोठा गंडा घातला. त्या तरुणाला इतका त्रास दिला की त्याने थेट आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राजस्थानातील जियागुडा गंगानगर भागातील एक 22 वर्षीय तरुण राजकुमार यादव याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. अधिक तपासानंतर असं समोर आलं, की एका लोन App स्कॅमनंतर त्याने ही आत्महत्या केली. या तरुणाने फेक लोन App डाउनलोड केलं होतं आणि ते फ्रॉड निघालं. या App द्वारे चीनच्या काही सायबर क्रिमिनल्सनी त्याला इतकं फसवलं, इतका त्रास दिला की त्याने थेट आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

हे वाचा - सेमीकंडक्टर अशी काय जादू आहे? ज्याच्या तुटवड्याने जगभरात वाहन उद्योगाला बसलीय खिळ?

काय आहे प्रकरण?

राजकुमार यादवने काही दिवसांपूर्वी आपल्या स्मार्टफोनवर एक App डाउनलोड केलं होतं. त्या फेक App द्वारे त्याने 12 हजार रुपयांचं लोन घेतलं होतं. जवळपास 11 दिवसांपूर्वी सायबर क्रिमिनल्सनी त्याला अनेक कॉल आणि धमक्या देऊन त्याचा जीव घेतला. त्याच्या मृत्यूनंतर या फेक App चा प्रकार समोर आला. या Fraud Loan App द्वारे सायबर क्रिमिनल्सनी 4.5 लाख लोकांना अप्रोच केलं असून प्रत्येक व्यक्तीकडून 50 ते 1.5 लाख रुपये चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ऑनलाइन कोणतंही App डाउनलोड करताना त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. अनेक फेक App आपल्याला खरेच वाटतात पण त्यातून फ्रॉड होतो. अशा App द्वारे युजरची माहिती फ्रॉडस्टर्सपर्यंत पोहोचते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक बाबींसाठी बँकेचा किंवा योग्य व्यक्तीचा सल्ला फायद्याचा ठरेल अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

First published:

Tags: Apps, Cyber crime, Fake, Online fraud