नवी दिल्ली, 2 मार्च : जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मोठी कारवाई केली आहे. कंपनीने जानेवारी 2022 दरम्यान 18.58 लाख भारतीयांचे व्हॉट्सअॅप अकाउंट्स (WhatsApp Account Banned) बॅन केले आहेत. कंपनीने मंगळवारी जारी केलेल्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीने नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी तक्रार विभाग आणि त्यांच्या सिस्टमद्वारे युजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp ला 495 भारतीय अकाउंटविरोधात तक्रारी आल्या. त्यापैकी 285 WhatsApp Accounts बंद करण्यासाठी अपील करण्यात आलं होतं. यापैकी 24 व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली. रिपोर्टनुसार, 18.58 लाख पैकी अधिकतर अकाउंट्सवर कंपनीने नुकसानकारक वर्तनाच्या आधारावर बंदी घातली आहे.
डिसेंबरमध्ये 20 लाखहून अधिक अकाउंट बॅन -
मागील डिसेंबरमध्ये कंपनीने 20 लाखहून अधिक भारतीय अकाउंट्स बॅन केले होते. डिसेंबरमध्ये 2,079,000 भारतीय युजर्सचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद करण्यात आले. नव्या IT नियम 2021 नुसार, कंपनीने सांगितलं, की त्यांना फेक अकाउंटसाठी 528 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 24 अकाउंटवर कारवाई करण्यात आली.
WhatsApp ने 16 जून ते 31 जुलै 2021 दरम्यान 594 तक्रारी मिळाल्यानंतर 3,027,000 भारतीय युजर्सचे अकाउंट्स बंद केले होते. 95 टक्के प्रकरणांत स्पॅम मेसेजेसमुळे अकाउंट्स बॅन केल्याचं व्हॉट्सअॅपने सांगितलं होतं. जागतिक स्तरावर WhatsApp ने एका जून ते जुलै 2021 या महिन्यात जवळपास 80 लाख अकाउंट्स बॅन केले होते.
युजर्सची सुरक्षा लक्षात घेता व्हॉट्सअॅप अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेतला जातो. नव्या आयटी नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट द्यावा लागतो. त्याच रिपोर्टमध्ये WhatsApp ने कारवाईची माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp News, WhatsApp user