मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsAppचा युजर्सना मोठा झटका! 17 लाखांपेक्षा जास्त भारतीयांचं अकाउंट केलं ब्लॉक, काय आहे कारण?

WhatsAppचा युजर्सना मोठा झटका! 17 लाखांपेक्षा जास्त भारतीयांचं अकाउंट केलं ब्लॉक, काय आहे कारण?

WhatsApp ने लाखो भारतीयांना मोठा झटका दिला आहे. सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अनुपालन अहवालात म्हटले आहे की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 17.5 लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगल (Google) नोव्हेंबमध्ये युजर्सकडून  26,087 तक्रारी मिळाल्यानंतर 61,114 कंटेट हटवले होते

पुढे वाचा ...

मुंबई, 02 जानेवारी: WhatsApp ने लाखो भारतीयांना मोठा झटका दिला आहे. सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अनुपालन अहवालात म्हटले आहे की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 17.5 लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. या कालावधीत 602 तक्रारी आल्याचेही त्यांनी नमुद केले आहे. त्यांच्या लेटेस्ट अहवालात या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की या कालावधीत WhatsApp वरील 17,59,000 भारतीय खाती बंद करण्यात आली आहेत. अहवालानुसार, भारतीय खाते +91 फोन नंबरद्वारे ओळखले जाते.

WhatsApp च्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे की, 'IT नियम 2021 नुसार, आम्ही नोव्हेंबर महिन्यासाठी आमचा सहावा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. या युजर-सिक्योरिटी अहवालामध्ये युजर्सच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या संबंधित कृती तसेच WhatsApp द्वारे स्वत:हून केलेल्या कारवाईचा तपशील समाविष्ट आहे.'

हे वाचा-2022 मध्ये Royal Enfieldच्या या नव्या नव्या बाईक्स होणार लाँच

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने नोव्हेंबर महिन्यात 17.5 लाखांहून अधिक खात्यांवर निर्बंध आणला आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या या कंपनीने याआधी असे म्हटले होते की,  95% पेक्षा जास्त निर्बंध स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे आहेत.

गूगलने देखील हटवला कंटेट

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगल (Google) नोव्हेंबमध्ये युजर्सकडून  26,087 तक्रारी मिळाल्यानंतर 61,114 कंटेट हटवले होते. कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या मासिक पारदर्शिता रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. गूगलने युजर्सनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आणि स्वयंचलित तपासणीच्या आधारे 3,75,468 कंटेंट काढून टाकला आहे.

हे वाचा-एकदाच पैसे द्या, वर्षभर झंझट नाही; धमाकेदार मोबाईल रिचार्ज प्लॅन

कंपनीने अशी माहिती दिली आहे की, नोव्हेंबरमध्ये भारतातील वैयक्तिक युजर्सकडून 24,569 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे, कंपनीने 48,594 कंटेट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आणि 3,84,509 कंटेट स्वतः केलेल्या तपासणीनंतर काढून टाकले.

First published:

Tags: Whatsapp, Whatsapp alert, Whatsapp chat