मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Royal Enfield Upcoming Bike: 2022 मध्ये Royal Enfieldच्या या नव्या नव्या बाईक्स होणार लाँच

Royal Enfield Upcoming Bike: 2022 मध्ये Royal Enfieldच्या या नव्या नव्या बाईक्स होणार लाँच

 भारतात रॉयल एनफिल्ड घेणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट म्हणजेच स्टेटस सिम्बॉल मानली जाते. रॉयल एनफिल्डच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 2022 या नव्या वर्षात रॉयल एनफिल्ड त्यांच्या नव्या जबरदस्त बाईक्स लाँच करण्याची तयारी करत आहेत.

भारतात रॉयल एनफिल्ड घेणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट म्हणजेच स्टेटस सिम्बॉल मानली जाते. रॉयल एनफिल्डच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 2022 या नव्या वर्षात रॉयल एनफिल्ड त्यांच्या नव्या जबरदस्त बाईक्स लाँच करण्याची तयारी करत आहेत.

भारतात रॉयल एनफिल्ड घेणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट म्हणजेच स्टेटस सिम्बॉल मानली जाते. रॉयल एनफिल्डच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 2022 या नव्या वर्षात रॉयल एनफिल्ड त्यांच्या नव्या जबरदस्त बाईक्स लाँच करण्याची तयारी करत आहेत.

    मुंबई, 31 डिसेंबर : रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) क्रूझर मोटारसायकल ही बाईकस्वारांची आवडती बाईक आहे. खरंतर भारतात रॉयल एनफिल्ड घेणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट म्हणजेच स्टेटस सिम्बॉल मानली जाते. रॉयल एनफिल्डच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 2022 या नव्या वर्षात रॉयल एनफिल्ड त्यांच्या नव्या जबरदस्त बाईक्स लाँच करण्याची तयारी करत आहेत. म्हणजे अर्थातच येणाऱ्या वर्षातही रॉयल एनफिल्डची धूम असणार हे नक्की. नुकतेच याच्या scram 411 चं टेस्टिंग झालं. तसंच ईआयसीएमए 2021 च्या नव्या बाईकबद्दलही माहिती देण्यात आली होती. आता आम्ही तुम्हाला 2022 मध्ये लाँच होणाऱ्या रॉयल एनफिल्डच्या सगळ्या बाईक्सबद्दल माहिती देणार आहोत.

    Scram 411

    नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच रॉयल एनफील्ड (Royal Enfield) त्यांची Royal Enfield Scram 411 लाँच करणार आहे. अलीकडेच या मॉडेलचा प्रोटोटाइप टेस्टिंगदरम्यान नजरेस पडला होता. Scram 411 ही हिमालयन एडीव्हीचं (Himalayan ADV) रोड बायस्ड व्हर्जन असेल. ही बाईक परवडणाऱ्या किंमतीत असेल आणि शिवाय तिचा परफॉरमन्सही दमदार असेल.

    Hunter 350

    आधी लाँच करण्यात आलेल्या Meteor 350 वर ही रॉयल एनफील्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) आधारित असेल. Meteor 350 ही बाईक 2020 वर्षअखेरीला भारतात लाँच करण्यात आली होती. Hunter 350 या बाईकला 17 इंचाचे छोटे अलॉय व्हील जोडलेले असतील. त्यामुळे ही जास्त किफायतशीर असेल. याची किंमत कमी करण्यासाठी कंपनी Meteor 350 मध्ये वापरण्यात येणारं ट्रिपल पॉड क्लस्टर काढू शकतं, असं सांगितलं जात आहे.

    Shotgun 650 (SG 650)

    650 cc इंजिन असलेली बाईक रॉयल एनफिल्ड शॉटगन Royal Enfield Shotgun) ही बाईक रॉयल एनफिल्डच्या लिस्टमध्ये सर्वात टॉपवर आहे. ही बाईक एक क्रूझर बाईक आहे. Interceptor 650 आणि Continental GT 650 सारखी पॉवर यातून जनरेट होते. याचं इंजिन 47.65 PS ची पॉवर आणि 52 Nm चा टार्क जनरेट करतं. नवी शॉटगनमध्ये सीटची उंची थोडी कमी केली जाईल असा अंदाज आहे.

    लाँच होण्याची शक्यता असलेल्या इतर RE bikes बाईक्स

    2022 या वर्षात कंपनी काही MY अपडेट्स सादर करेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अपडेटेड बुलेट 350 सुद्धा येण्याची शक्यता आहे अशीदेखील एक अफवा आहे. तसंच कंपनीनं इंटरसेप्टर 650 वर एका नव्या एक्झॉस्ट लेआउटचं टेस्टिंग केल्याचं पाहण्यात आलं होतं, अशीही अफवा आहे. त्यामुळे रॉयलएनफिल्डप्रेमींनी त्यांचं बजेट आखून नव्या बाईक्ससाठी तयारी करायला हरकतच नाही.

    First published:

    Tags: Auto expo, Royal enfield 350