मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /iPhone युजर्ससाठी WhatsApp ची घोषणा, हे मॉडेल वापरणाऱ्यांसाठी Alert

iPhone युजर्ससाठी WhatsApp ची घोषणा, हे मॉडेल वापरणाऱ्यांसाठी Alert

iPhone मध्ये WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता काही जुन्या आयफोनमध्ये वर्जन युजर्सला WhatsApp चे काही फीचर्स वापरता येणार नाही.

iPhone मध्ये WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता काही जुन्या आयफोनमध्ये वर्जन युजर्सला WhatsApp चे काही फीचर्स वापरता येणार नाही.

iPhone मध्ये WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता काही जुन्या आयफोनमध्ये वर्जन युजर्सला WhatsApp चे काही फीचर्स वापरता येणार नाही.

नवी दिल्ली, 23 मे : iPhone मध्ये WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता काही जुन्या आयफोनमध्ये वर्जन युजर्सला WhatsApp चे काही फीचर्स वापरता येणार नाही. iOS 10, iOS 11, iPhone5C आणि iPhone5 आता काही WhatsApp सुविधांचा वापर करू शकणार नाहीत.

WhatsApp येणाऱ्या काही महिन्यात iOS 10, iOS 11, iPhone 5 आणि iPhone 5C साठी सपोर्ट सोडण्याची योजना आखत आहे. बदलती टेक्नोलॉजी आणि ऑनलाइन धोके लक्षात घेता युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी नवे अपडेट लागू करत कंपन्या अनेक अपडेट देत असतात. त्यानुसारच इन्स्टंट मेसेजिंग App ने जुन्या iPhones मध्ये iOS च्या जुन्या वर्जनसाठी काही सुविधा परत घेण्याची घोषणा केली आहे.

हे वाचा - Cyber Fraud: PAN कार्ड अपडेट करण्यासाठी लिंकवर केलं क्लिक, महिलेला एक चूक पडली महागात; लाखोंचा गंडा

या अपडेटनंतर WhatsApp चे अनेक इन-अॅप फीचर जगभरातील आयफोन युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत. हे केवळ अशा युजर्ससाठी असेल, जे जुन्या iOS वर्जनचा वापर करत आहेत. अशाप्रकारचे अपडेट अँड्रॉइड इकोसिस्टमसाठी वेळोवेळी लाँच केले जातात. WhatsApp ट्रॅकर WABetaInfo नुसार, इन्स्टंट मेसेजिंग App 24 ऑक्टोबरनंतर काही iPhone ला सपोर्ट करणं बंद करेल.

iOS 10 आणि iOS 11 वर चालणारे सर्व डिव्हाइस या अपडेटनंतर सर्व फीचर्स, सुविधांसह योग्यरित्या काम करू शकणार नाहीत. iOS 12 चा वापर करणारे युजर्स WhatsApp च्या सर्व फीचर्सचा वापर करू शकतात.

हे वाचा - चीन सोडून भारतात येण्याच्या तयारीत Apple? उत्पादन आणि व्यापाराच्या शक्यतांवर विचार

iOS साठीचं हे अपडेट रोलआउट झाल्यानंतर अनेक इन-अॅप फीचर आयफोन युजर्ससाठी ग्लोबली उपलब्ध होऊ शकत नाही. या बदलानंतर कोणत्या सुविधा वापरता येणार नाहीत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या सुविधा प्रतिक्रिया किंवा पेमेंट असू शकतात.

First published:
top videos

    Tags: Iphone, Tech news, Whatsapp alert, Whatsapp New Feature, WhatsApp user