Home /News /technology /

चीन सोडून भारतात येण्याच्या तयारीत Apple? उत्पादन आणि व्यापाराच्या शक्यतांवर विचार

चीन सोडून भारतात येण्याच्या तयारीत Apple? उत्पादन आणि व्यापाराच्या शक्यतांवर विचार

टेक जायंट कंपनी Apple संबधी एक माहिती समोर आली आहे. Apple आपलं उत्पादन चीनमधून दुसऱ्या देशात ट्रान्सफर करण्यावर विचार करत असून त्यासाठी भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

  नवी दिल्ली, 22 मे : उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. कोरोनानंतर जगभरातील बाजारात खळबळ उडाली असताना अशा परिस्थितीत भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सतत पुढे जात आहे. याचाच परिणाम म्हणजे सर्व जागतिक प्रसिद्ध कंपन्यांच्या नजरेत भारत गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ बनत आहे. अनेक मोठ्या कंपन्या इतर देशांतून आपला व्यवसाय काढून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता टेक जायंट कंपनी Apple संबधी एक माहिती समोर आली आहे. Apple आपलं उत्पादन चीनमधून दुसऱ्या देशात ट्रान्सफर करण्यावर विचार करत असून त्यासाठी भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. भारताला पहिली पसंती - Apple ने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, Apple भारतात आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार आणि अभ्यास करत असल्याची माहिती आहे. Apple च्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. अंदाजानुसार, आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक कंप्यूटर यासारखी 90 टक्के Apple उत्पादनं चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात. चीनमध्ये कुशल कामगारांची संख्या इतकी आहे, की ही संख्या अनेक आशियाई देशांच्या लोकसंख्येपेक्षआ जास्त आहे. याशिवाय Apple ने चीनमधील स्थानिक सरकारांसोबत काम केलं आहे. त्यांच्या कंत्राटदारांकडे पुरेशा पायाभूत सुविधा आहेत. पायाभूत सुविधांचा पुरवठा आणि मोठ्या प्रमाणात आयफोनचं उत्पादन, स्टोअर आणि पुरवठा करण्यासाठी संसाधनेही आहेत.

  हे वाचा - Cyber Fraud: PAN कार्ड अपडेट करण्यासाठी लिंकवर केलं क्लिक, महिलेला एक चूक पडली महागात; लाखोंचा गंडा

  जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात Apple चे वरिष्ठ अधिकारी या विषयावर सातत्याने चर्चा करत आहेत. बीजिंगची दडपशाही आणि अमेरिकेसोबतचा वाढता वाद हे चीनमधून आपला व्यवसाय काढून घेण्यामागचं कारण असल्याचं सांगत आहेत. निरिक्षकांच्या मते, चीनवरील Apple चं अवलंबित्व मोठ्या जोखमीत आहे. Apple च्या उत्पादन योजनांशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, मोठी लोकसंख्या आणि कमी किमतीमुळे कंपनी भारताकडे पुढील चीन म्हणून पाहत आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Tech news

  पुढील बातम्या