मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /... तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला जेलमध्ये पोहचवू शकतो, फोन वापरताना काय काळजी घ्याल?

... तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला जेलमध्ये पोहचवू शकतो, फोन वापरताना काय काळजी घ्याल?

स्मार्टफोन ही गरजेची वस्तू असली तरी तिचा वापर काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

स्मार्टफोन ही गरजेची वस्तू असली तरी तिचा वापर काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

स्मार्टफोन ही गरजेची वस्तू असली तरी तिचा वापर काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

  मुंबई, 9 जुलै : सध्याच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) खूपच आवश्यक गोष्ट आहे. जगभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण स्मार्टफोनचा वापर प्रामुख्याने कॉलिंगसाठी, तसेच सर्फिंग, गेम्स खेळणं, चित्रपट पाहणं, संगीताचा आनंद घेणं आदी गोष्टींसाठी करतो. स्मार्टफोनचा वापर जितका उपयुक्त ठरतो, तितकाच काही वेळा तो धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे स्मार्टफोनवर विशेषतः सर्च (Searching) करताना युझरने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. स्मार्टफोनवर दुसऱ्याच्या भावना दुखवणारे मेसेज शेअर करणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे खासगी फोटो, व्हिडिओ शेअर करणं किंवा लीक (Leak) करणं टाळायला हवं. अशा गोष्टी जाणीवपूर्वक किंवा अनवधानानं केल्यास संबंधित युझर्सवर कायदेशीर कारवाई (Legal Action) होऊ शकते. प्रसंगी अशा युझर्सना तुरुंगवासाची (Jail) शिक्षादेखील होऊ शकते. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  स्मार्टफोनवर आपण गुगल (Google) किंवा ब्राउझरवर दिवसभरात अनेक गोष्टी सर्च करतो. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडिओ, ऑडिओ किंवा कंटेंट शेअर करतो; पण हे सर्व करताना काळजी घेणं आवश्यक आहे. खरं तर स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण मित्र, कुटुंबातले सदस्य आणि नातेवाईकांसोबत कनेक्टेड असतो. काही वेळा लोकांचे खासगी फोटो किंवा व्हिडिओ पाठवले जातात. तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) किंवा खासगीत असे फोटो, व्हिडीओ लीक केले, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. प्रसंगी तुरुंगात जावं लागू शकतं. एखाद्या व्यक्तीचे खासगी फोटो, व्हिडिओ लीक करणं कायदेशीर गुन्हा आहे.

  ATM Alert : सावधान! मृत व्यक्तीचं एटीएम कार्ड वापरून पैसे काढता का? जावं लागेल तुरुंगात; जाणून घ्या नियम

  स्मार्टफोन ही गरजेची वस्तू असली तरी तिचा वापर काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले मेसेज पूर्ण न वाचताच किंवा खात्री न करताच फॉरवर्ड केले जातात. काही मेसेज जात, धर्म, वर्ण किंवा जेंडरशी संबंधित आक्षेपार्ह भाष्य करणारे असतात. असे भावना दुखावणारे नकारात्मक मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड केले, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा गोष्टीसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

  FASTag खरेदी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; नाहीतर फसवणूक झालीच म्हणून समजा

  स्मार्टफोनवर गुगल सर्चचा (Google Search) वापर केला जातो. गुगल सर्च करताना कोणत्याही स्वरूपाच्या असंवेदनशील गोष्टी शोधू नयेत. गुगलवर बॉम्ब, शस्त्रं आदींसंदर्भात सर्च केल्यास तुरुंगाची हवा खावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनवर सर्च करताना या गोष्टी टाळणं गरजेचं आहे.

  First published:

  Tags: Smart phone, Tech news, Viral