मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » ATM Alert : सावधान! मृत व्यक्तीचं एटीएम कार्ड वापरून पैसे काढता का? जावं लागेल तुरुंगात; जाणून घ्या नियम
ATM Alert : सावधान! मृत व्यक्तीचं एटीएम कार्ड वापरून पैसे काढता का? जावं लागेल तुरुंगात; जाणून घ्या नियम
ATM Alert: आपण बऱ्याचदा मित्रांची, नातेवाईकांचं एटीएमकार्ड वापरत असतो, परंतु समजा आपला एखादा नातेवाईक हयात नाहीत, आणि तुम्ही त्या तुम्ही मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरत असाल तर काय होईल? असं करणं चुकीचं आहे का? मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढणं हा दंडनीय गुन्हा आहे का? याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.
आपण बऱ्याचदा मित्रांचं, नातेवाईकांचं एटीएमकार्ड वापरत असतो. परंतु समजा आपला एखादा नातेवाईक हयात नाहीत आणि तुम्ही त्या मृत व्यक्तीचं एटीएम कार्ड वापरत असाल तर काय होईल?
2/ 9
मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढणं हा दंडनीय गुन्हा आहे का? असं करणं चुकीचं आहे का? याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.
3/ 9
शिक्षेची आहे तरतूद- वास्तविक, अनेक वेळा अशी प्रकरणं समोर येतात, जिथे लोक एटीएम कार्ड वापरून मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढतात. परंतु येथे हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे की असं करणं बेकायदेशीर आहे.
4/ 9
नॉमिनी देखील बँकेला कळवल्याशिवाय मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकत नाही. असे करताना आढळल्यास नियमानुसार त्याला शिक्षा होऊ शकते.
5/ 9
नॉमिनी मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतो, पण त्यासाठी काही नियम आहेत. काही वेळा खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी असतात.
6/ 9
अशा परिस्थितीत, नॉमिनीला बँकेला संमतीपत्र दाखवावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता.
7/ 9
पैसे काढण्याचा हा मार्ग- कोणतीही व्यक्ती जी अशा खात्याची नॉमिनी आहे, ज्याचा खातेदार मरण पावला आहे, तो खात्यात जमा केलेल्या पैशासाठी दावा करू शकतो.
8/ 9
यासाठी नॉमिनीला एक फॉर्म भरावा लागेल आणि मृत व्यक्तीच्या बँक खात्याचं पासबुक, खात्याचा टीडीआर, चेकबुक, मृत्यू प्रमाणपत्र, त्याचं आधार आणि पॅन कार्ड द्यावं लागेल.