मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Stock आणि Custom Android फोन म्हणजे काय? दोघांमधील फरक जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणता चांगला?

Stock आणि Custom Android फोन म्हणजे काय? दोघांमधील फरक जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणता चांगला?

आयफोन वगळता इतर सर्व मोबाईल कंपन्या सध्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. काही कंपन्या Android वर त्यांचा UI (User Interface) स्तर प्रदान करतात. ज्यांना कस्टम अँड्रॉइड म्हणतात. त्याचवेळी, काही मोबाइल कंपन्या UI शी छेडछाड न करता मोबाइलमध्ये Android स्थापित करतात, त्यांना स्टॉक अँड्रॉइड म्हणतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 डिसेंबर : फोन खरेदी करताना तुम्ही कस्टम अँड्रॉइड आणि स्टॉक अँड्रॉइड या दोन गोष्टींचं नाव ऐकलं असेलच. पण हे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आपणा सर्वांना Android बद्दल माहित असणे आवश्यक आहे. सध्या, बहुतेक स्मार्टफोन्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. Android ही Google द्वारे प्रदान केलेली ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. ज्याचा वापर कोणतीही कंपनी सहज करू शकते. Android Inc या कंपनीने अँड्रॉइड ऑपरेटिंग विकसित केली. पण, नंतर गुगलने ती विकत घेतली.

स्टॉक अँड्रॉइड हे गुगलचे मूळ अँड्रॉइड व्हर्जन आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक फीचर्स मिळतात, तर कस्टम अँड्रॉइड कंपनी गुगलकडून विकत घेते, ज्यामध्ये कंपनी गुगलच्या अँड्रॉइडला स्वतः कस्टमाइझ करते आणि मोबाइलमध्ये अधिक चांगल्या फीचर्स देते.

यूजर इंटरफेस

यूजर इंटरफेसबद्दल बोलायचे झाले तर, स्टॉक अँड्रॉइड तुम्हाला बरीच मूलभूत वैशिष्ट्ये देते, तर कस्टम अँड्रॉइडमध्ये तुम्ही बरेच कस्टमायझेशन करू शकता. जसे की फोनचा फॉन्ट बदलणे, वेगवेगळ्या थीम सेट करणे, अॅपचे आयकॉन बदलणे आणि तुम्ही लॉक स्क्रीन देखील बदलू शकता.

अॅप्स कोणते चांगले आहे?

स्टॉक अँड्रॉइडमध्ये तुम्हाला फक्त तेच अॅप्स मिळतील जे तुम्हाला गुगलकडून मिळतात, पण कस्टम अँड्रॉइडमध्ये तुम्ही ज्या कंपनीचा मोबाइल घेतला आहे त्या कंपनीचे अॅप्सही मिळतात. जसे, स्क्रीन रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग आणि गेम मोड.

Alert! Joker Malware पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, Android Smartphone मधून लगेच डिलीट करा हे App

सुरक्षेच्या बाबतीत कोण भारी?

सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, तुमचा मोबाइल स्टॉक अँड्रॉइडमध्ये जास्त सुरक्षित आहे, तर कस्टम अँड्रॉइडमध्ये अनेक थर्ड पार्टी अॅप्स आहेत, ज्यामुळे तुमच्या फोनची सुरक्षा कमी होते.

कोणाची कामगिरी चांगली?

स्टॉक अँड्रॉइडची कामगिरी कस्टमपेक्षा चांगली आहे. मात्र, अनेक कंपन्या 10 हजारांहून अधिक महागड्या फोनमध्ये रॅम ऑप्टिमायझेशन फीचर देतात, ज्यामुळे कस्टम अँड्रॉइडची कामगिरी अधिक चांगली होते.

जर तुम्हाला सध्या बाजारात स्टॉक अँड्रॉइड फोन हवा असेल तर तुम्ही Mi A3 आणि Google Pixel सारख्या स्मार्टफोन्समध्ये स्टॉक Android अनुभव घेऊ शकता. जर तुम्हाला कस्टम अँड्रॉइड अनुभव घ्यायचा असेल तर Mi चे MIU, Vivo चे Funtouch OS, One Plus चे Oxygen OS आणि Realme आणि Oppo ला Color OS मिळेल.

First published:

Tags: Android, Smartphone, Smartphones