मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /4.1 कोटी WhatsApp मेसेज, 38 लाख Google Search...आणि बरंच काही; 1 मिनिटांत इंटरनेटवर काय-काय होतं?

4.1 कोटी WhatsApp मेसेज, 38 लाख Google Search...आणि बरंच काही; 1 मिनिटांत इंटरनेटवर काय-काय होतं?

31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते रात्रीपर्यतचा वेळ सर्वात व्यस्त असतो, ज्यावेळी सर्वजण एकमेकांना न्यू ईयरच्या शुभेच्छा देत असतात.

31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते रात्रीपर्यतचा वेळ सर्वात व्यस्त असतो, ज्यावेळी सर्वजण एकमेकांना न्यू ईयरच्या शुभेच्छा देत असतात.

31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते रात्रीपर्यतचा वेळ सर्वात व्यस्त असतो, ज्यावेळी सर्वजण एकमेकांना न्यू ईयरच्या शुभेच्छा देत असतात.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : इंटरनेटमुळे (Internet) संपूर्ण जग बदललं आहे. एका क्लिकवर जगभरातील कोणतीही माहिती उपलब्ध होते. स्मार्टफोन, इंटरनेटच्या जगात काही सेकंदात जगातली कोणतीही माहिती लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहचते. इंटरनेटवर केवळ एका मिनिटांत अनेक घडामोडी घडत असतात. इंटरनेटवर 60 सेकंदात किती आणि काय गोष्टी होतात?

इंटरनेटद्वारे सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एका मिनिटांत जवळपास 4.1 कोटी मेसेज पाठवले जातात. 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते रात्रीपर्यतचा वेळ सर्वात व्यस्त असतो, ज्यावेळी सर्वजण एकमेकांना न्यू ईयरच्या शुभेच्छा देत असतात.

ईमेलवर (Email) एका मिनिटांत जगभरात 18 कोटी खासगी आणि ऑफिशिअल मेल पाठवले जातात. हे जीमेल (Gmail), आउटलूट (Outlook), याहू (Yahoo), हॉटमेल (Hotmail) अशा पॉप्युलर ईमेल सर्विस आहेत. ऑनलाईन शॉपिंगद्वारे (Online Shopping) लोक प्रत्येक एका मिनिटाला 10 लाख रुपयांची खरेदी करतात.

Amazon च्या सीक्रेट वेबसाईटबद्दल कधी ऐकलात का? कमी किंमतीत मिळतात वस्तू

एका मिनिटांत गुगलवर (Google) जवळपास 38 लाख सर्च केले जातात. गुगल अ‍ॅप स्टोर (Google Play Store) आणि अ‍ॅपल स्टोरवर (Apple Store) एका मिनिटांत जवळपास 3.90 लाख अ‍ॅप डाउनलोड केले जातात.

Alert! तुम्हाला PAN Cardसंबंधी असा मेसेज आला का?वेळीच व्हा सावध,अन्यथा बसेल फटका

फेसबुकवर (Facebook) एका मिनिटांत अर्थात 60 सेकंदात 10 लाख लोक लॉगइन असतात. तर इन्स्टाग्रामवर (Instagram) 3,47,222 फोटो एका मिनिटांत अपलोड केले जातात.

जगातील सर्वात मोठ्या व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर (YouTube) एक मिनिटांत 45 लाख व्हिडीओ पाहिले जातात. यावर लोक गाणीही ऐकतात. तर नेटफ्लिक्सवर (Netflix) 1 मिनिटात 6.94 लाख तासांच्या व्हिडीओ पाहिल्या जातात.

First published:

Tags: Internet, Internet use