नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: अमेझॉन (Amazon) ही ई-कॉमर्स कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. ऑनलाईन शॉपिंग करणारे तर नियमितपणे या कंपनीच्या वेबसाईटला किंवा अॅपला भेट देतात. वस्तूंची योग्य किंमत, चांगला डिस्काऊंट आणि रिटर्न पॉलिसी या सगळ्यामुळे ग्राहकांना अमेझॉनची सेवा आवडते. अमेझॉनबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. पण, अमेझॉनच्या एका सीक्रेट वेबसाईटबद्दल (Amazon Secret website) अगदी कमी जणांना माहिती असेल. विशेष म्हणजे, या सीक्रेट वेबसाईटवर अमेझॉनवर असणारे प्रॉडक्ट्स निम्म्याहून कमी किंमतीला (Amazon products at half price) उपलब्ध आहेत. बऱ्याच वेळा एखादी वस्तू आवडली नाही, तर आपण ती रिटर्न करतो. अशा वस्तू अमेझॉन परत घेतल्यानंतर फेकून न देता, त्या आपल्या वेअरहाऊसमध्ये (Amazon warehouse) ठेवते. यासोबतच, थोड्याफार जुन्या झालेल्या वस्तूही याठिकाणी ठेवल्या जातात. इथूनच त्या सीक्रेट वेबसाईटवर विकण्यासाठी उपलब्ध होतात. यामुळे या वापरलेल्या, किंवा ओपन बॉक्स प्रॉडक्ट्सवर (Open box products) अमेझॉन मोठ्या प्रमाणात सूट देतं. मार्टिन लुईस यांच्या मनीसेव्हिंग एक्सपर्ट (moneysavingexpert.com) या वेबसाईटवर एका यूझरने आपला अनुभव शेअर केला आहे. तो म्हणतो, “एकदा मी प्रेशर वॉशर घेण्यासाठी अमेझॉन वेअरहाऊसवर गेलो होतो. मला जे विशिष्ट मॉडेल हवं होतं, ते इतर वेबसाईट्सवर जवळपास 20 हजार रुपयांपर्यंत मिळत होतं. मात्र, तेच मॉडेल मला इथं अवघ्या 13 हजार रुपयांना मिळालं. त्यामुळे मग तिथून पुढे मी अमेझॉन वेअरहाऊस (Amazon warehouse) वरुनच खरेदी करण्यास सुरुवात केली.
अमेझॉन याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे आधी परीक्षण करते. त्यानंतरच त्या वस्तूंना ठराविक ग्रेड देऊन विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं. या सीक्रेट वेबसाईटवरही (Amazon secret website) आपल्याला अमेझॉनसारख्याच सुविधा मिळतात. याठिकाणी देखील तुम्हाला 30 डेज रिटर्न पॉलिसी मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉन वेअरहाऊसमध्ये तब्बल 40 हजारांहून अधिक उत्पादने (Amazon warehouse products) उपलब्ध आहेत. ही सर्व उत्पादने तुम्ही जवळपास निम्म्या, किंवा त्याहून कमी किंमतीला खरेदी करू शकता.
स्मार्टफोन वापरून कमवा पैसे! करावं लागेल हे काम
याठिकाणी तुम्हाला सुमारे 34 वेगवेगळे सेक्शन दिसून येतील. यात कम्प्युटर आणि एक्सेसरीज, किचन अँड युटेन्सिल्स, खेळणी, व्हिडिओ गेम्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड फोटो यांसोबत इतर अनेक कॅटेगरीज आहेत. अमेझॉनच्या या सीक्रेट वेबसाईटवर वस्तूंची किंमत एवढी कमी आहे, की दुसरीकडे पाच ते सात हजारांना मिळणारी वस्तू, इथं केवळ दोन हजारांना मिळून जाते. नेस्कॅफेचं सिंगल सर्व्हिंग कॉफी मशीन, जे इतर ठिकाणी पाच ते सात हजार रुपयांना उपलब्ध आहे. ती या ठिकाणी केवळ दोन हजार रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता.