नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : देशात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. हॅकर्स बँकांच्या नावाने मेसेज पाठवून लोकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. याबाबत सरकारसह अनेक बँकांकडूनही वेळोवेळी अलर्ट करण्यात येतं. स्टेट बँक ऑफ इंडियानेही (SBI) आपल्या ग्राहकांना अशाच एका बनावट मेसेजबाबत अलर्ट केलं असून फसवणुकीपासून सावध राहण्याचं सांगितलं आहे.
सध्या SBI ग्राहकांना पॅन कार्डबाबत (Pan Card) एक मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये SBI Yono App अकाउंट सस्पेंड होण्याबाबत सांगितलं जात आहे. याबाबतच बँकेने ग्राहकांना अलर्ट केलं असून अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं सांगितलं आहे.
सायबर क्रिमिनल्सकडून ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहेत, ज्यात SBI युजर तुमचं SBI Yono अकाउंट ब्लॉक झालं आहे. तुमचं पॅन कार्ड अपडेट करा, असं सांगितलं जात आहे. या मेसेजमध्ये पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी एक लिंकही दिली आहे. ही लिंक SBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक नाही. या वेबसाईटचं नाव SBI शी मिळतं-जुळतं आहे, परंतु ते एसबीआयचं नाही. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
SBI ग्राहकांना अशाप्रकारचे मेसेज मिळाल्यानंतर, ट्विटरद्वारे ग्राहकांनी बँकेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर SBI ने आपल्या ग्राहकांना युजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पीन, सीवीवी सारख्या पर्सनल आणि बँकिंग डिटेल्स मागणाऱ्या लिंक, कॉल, एसएमएस, ईमेलवर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचं सांगितलं आहे. अशावेळी ग्राहक Phishing/Smishing/Vishing attempt ची तक्रार report.phishing@sbi.co.in वर करू शकतात. तसंच हेल्पलाइन नंबर 155269 वर तक्रार करता येते.
@TheOfficialSBI I m getting these type of messages on daily basis, is this something related to fraudulent activity? pic.twitter.com/OaDGjBjQUS
— Viku Vasudevan (@Viku_Vasudevan) August 22, 2021
महत्त्वाची बाब म्हणजे, सायबर क्रिमिनल्स बँकेच्या लिंकप्रमाणे, वेबसाईटप्रमाणे अगदी जवळपास सारखीच दिसणारी लिंक, वेबसाईट तयार करतात. पण यात काहीसा फरक असतोच. त्यामुळे बँकेच्या किंवा इतर कोणत्याही नावाने आलेली लिंक थेट ओपन न करता. त्याची पडताळणी करावी. कोणत्याही लिंकवर क्लिक न करता, खासगी माहितीही कोणाशी शेअर करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Pan card, Sbi alert