Home /News /technology /

Republic Day 2022: घरबसल्या पाहा प्रजासत्ताक दिनाची भव्य परेड, असं करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Republic Day 2022: घरबसल्या पाहा प्रजासत्ताक दिनाची भव्य परेड, असं करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

लोक घरबसल्या ऑनलाइन परेड पाहू शकतात. त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. देशभरातून निवडलेल्या 480 कलाकारांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत.

  नवी दिल्ली, 26 जानेवारी : आज 73वा प्रजासत्ताक दिवस (Republic Day 2022) साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बुधवारी आयोजित परेडमध्ये (parade) 16 सैन्य दल, 17 मिलिट्री बँड तसचं विविध राज्य, विभाग आणि लष्करी दलांच्या 25 झलकांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी लोक घरबसल्या ऑनलाइन परेड पाहू शकतात. त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. देशभरातून निवडलेल्या 480 कलाकारांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. परेडदरम्यान विजय चौक ते नॅशनल स्टेडियमपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी परेड अर्धा तास उशिराने 10 ऐवजी 10.30 वाजता सुरू होईल. प्रजासत्ताक दिन परेड 2022 भारताच्या स्वातंत्र्यांच्या 75व्या वर्षात होत आहे, जो देशभरात आजादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) म्हणून साजरा केला जात आहे. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनी परेडही खास असणार आहे.

  हे वाचा - Republic Day: आज 73 वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर दिसणार देशाचं लष्करी सामर्थ्य

  घरबसल्या परेड पाहण्यासाठी असं करा रजिस्ट्रेशन - परेड पाहण्यासाठी https://www.mygov.in/rd2022 वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर डिटेल्स भरा आणि एक OTP येईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपवण्यासाठी OTP टाकावा लागेल. त्यानंतर ऑनलाइन परेड पाहता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, या परेडमध्ये भारतीय सैन्याच्या सहा मार्चिंग तुकड्यांमध्ये राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू-काश्मीर लाइट इन्फँट्री, शिख लाइट इन्फँट्री, आर्मी ऑर्डनेन्स कोर रेजिमेंट आणि पॅराशूट रेजिमेंट सामिल असतील. त्याशिवाय भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाचे प्रत्येकी एक-एक पायदळ तुकडी परेडमध्ये सहभागी होणार आहे.

  हे वाचा - Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी परंपरांमध्ये बदल, जाणून घ्या, राजपथावर करण्यात आलेले बदल

  परेडमध्ये पहिल्यांदाच 75 मीटर लांब आणि 15 फूट उंच स्क्रोल - परेडमध्ये पहिल्यांदाच 75 मीटर लांब आणि 15 फूट उंच 10 स्क्रोल प्रदर्शित केले जातील. हे संरक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कला कुंभ कार्यक्रमादरम्यान तयार केले आहेत. देशभरातील 600 हून अधिक नामवंत कलाकार आणि तरुण कलाकारांनी भुवनेश्वर आणि चंदिगढमध्ये दोन टप्प्यात हे तयार केले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Republic Day, Republic Day parade

  पुढील बातम्या