Home /News /national /

Republic Day 2022: आज 73 वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर दिसणार देशाचं लष्करी सामर्थ्य; परेड राजधानी दिल्ली गजबजणार

Republic Day 2022: आज 73 वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर दिसणार देशाचं लष्करी सामर्थ्य; परेड राजधानी दिल्ली गजबजणार

Republic Day 2022: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदा आपला देश 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.

    नवी दिल्ली, 26 जानेवारी: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदा आपला देश 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 1950 साली या दिवशी देशाची संविधान (The Constitution Of The Country) लागू झालं. या खास दिवशी राजधानी दिल्लीतील राजपथावर दरवर्षी भव्य परेडचे आयोजन केले जाते. देशाच्या आन, बान आणि शानची एक शानदार झलक बुधवारी राजपथावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन 2022 च्या निमित्ताने, भारताच्या लष्करी सामर्थ्याची आणि सांस्कृतिक विविधतेची झलक बुधवारी दिल्लीच्या राजपथवर पाहायला मिळेल. राजपथ येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद तिरंगा फडकवणार आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. भारतालाही यावेळी स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. प्रजासत्ताक दिन परेड-2022 भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात होत आहे, जो देशभरात 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा केला जात आहे. त्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात येत असून त्यासाठी सरकारने अनेक नवीन कार्यक्रम जाहीर केले आहेत. 75 विमाने भव्य फ्लाय-पास्ट भारतीय हवाई दलाच्या 75 विमानांचा भव्य फ्लाय-पास्ट, स्पर्धात्मक प्रक्रियेतून निवडलेल्या 480 नर्तकांचे सांस्कृतिक प्रदर्शन, 75 मीटर लांबीचे 10 स्क्रोल आणि 10 मोठ्या एलईडी स्क्रीनची स्थापना यासारखे कार्यक्रम बुधवारी होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली. डे परेड पहिल्यांदाच होणार आहे. एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आयोजित प्रजासत्ताक दिन परेड-2022 हा देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून साजरा केला जात आहे. फ्लाय-पास्ट दरम्यान कॉकपिटचा व्हिडिओ दाखवण्यासाठी भारतीय हवाई दलाने प्रथमच दूरदर्शनशी समन्वय साधला आहे. सोहळ्यादरम्यान, राजपथवरील परेड पूर्वीच्या 10 ऐवजी सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. दाट धुके पाहता वेळेत बदल करण्यात आला आहे. कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता, प्रेक्षकांच्या जागांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. यावर्षी केवळ 5,000 ते 8,000 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. सरकारने लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी ऑनलाइन लाइव्ह उत्सव पाहण्यासाठी MyGov पोर्टलवर नोंदणी करावी. त्यांना लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मार्चिंग दलआणि झलकसाठी मतदान करण्याची संधी देखील मिळेल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: India, Republic Day

    पुढील बातम्या