jio ला टक्कर देण्यासाठी Vodafoneची धमाकेदार ऑफर, दर दिवशी मिळणार दुप्पट डेटा

jio ला टक्कर देण्यासाठी Vodafoneची धमाकेदार ऑफर, दर दिवशी मिळणार दुप्पट डेटा

वोडाफोनच्या कोणत्या प्लानमधून ग्राहकांना दुप्पट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 09 मार्च : jioला टक्कर देण्यासाठी वोडाफोन-आयडिया कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी तीन धमाकेदार प्लान लाँच केले आहेत. या प्लानमधून jio आणि Airtel ग्राहकांच्या प्लानपेक्षा दुप्पट फायदा मिळेल असा दावा वोडाफोन-आयडिया कंपनीनं केला आहे. सर्व प्लानमध्ये 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय आणखी काही सेवा देण्यावर वोडाफोन कंपनीचा विचार सुरू आहे. त्यामुळे खिशाला परवडणारा आणि नवा वोडाफोन कंपनीचा हा बेस्ट प्लान काय आहे जाणून घेऊया.

249 रुपये वाला प्लान

या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये प्रतिदिवशी 1.5 GB डेटा यासोबत ऑफर सुरू असल्यास अधिक 3 GB ज्यादा डेटा मिळणार आहे. 28 दिवसांत एकूण 84 GB डेटा मिळणार आहे. यासोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग प्रिमिअर अॅपचं सबस्क्रिप्शन उपलब्ध होणार आहे. हा प्लान 22 टेलिकॉम सर्व्हिसेससाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिक चांगल्या सेवा यामध्ये उपलब्ध होणार असल्याचा कंपनीनं दावा केला आहे.

हे वाचा-जिओची धमाकेदार ऑफर! 350 जीबी डेटा वर्षभर वापरा, लाँच केले नवीन प्लॅन

399 रुपयांचा प्लान

यामध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता आणि यासोबत प्रतिदिन 3 GB डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवशी 100 SMS ची सेवाही उपलब्ध आहे. यासोबतच वोडाफोन प्ले, Zee5 अॅपचं सबस्क्रिब्शन मिळणार आहे.

599 रुपयांचा प्लान

वोडाफोन युझर्ससाठी हा प्लान सर्वात बेस्ट आहे असा दावा कंपनीनं केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. दरदिवशी 3 GB डेटा उपलब्ध होणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवशी 100 SMS उपलब्ध होणार आहेत. कंपनीकडून प्रिमियर अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

हे वाचा-...तर तुम्हाला 16 मार्चपासून ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही

First published: March 9, 2020, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading