Home /News /technology /

...तर तुम्हाला 16 मार्चपासून ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही

...तर तुम्हाला 16 मार्चपासून ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही

सध्या ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढलं आहे. बँकाही अनेक सुविधा ग्राहकांना पुरवत असतात.

    मुंबई, 07 मार्च : सध्या ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढलं आहे. बँकाही अनेक सुविधा ग्राहकांना पुरवत असतात. डेबिट/क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केलं जातं. मात्र अनेकांना ही सुविधा असल्याचं माहितीच नसतं. या कार्डचा वापर फक्त एटीएम किंवा स्वाइप करण्यापुरता केला जातो. त्यामुळे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून 16 मार्चच्या आधी किमान एकदा ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन करावं लागेल. ते न केल्यास त्यानंतर कॉन्टॅक्टलेस, ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही. यासाठी रिझर्व्ह बँकेनं 15 जानेवारीला नोटिफिकेशन जारी केलं होतं. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये गुगल पे, फोन पे यांच्या सेवेवर परिणाम होणार नाही. कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड होल्डर्सना पेमेंटसाठी कार्ड स्वाइप करण्याची गरज नसते. पॉइंट ऑफ सेल मशीनवरून पेमेंट होतं. एका दिवसात पाच कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. एका ट्रान्झॅक्शनचे लिमिट 2 हजार रुपयांपर्यंत आहे. यात RFID टेक्नॉलजीचा वापर केला जातो. डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंटमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे कार्ड ट्रान्झॅक्शन सुरक्षित करण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. नोटबंदीनंतर ऑनलाइन व्यवहारात वाढ झाली आहे. यामुळेच रिझर्व्ह बँकेनं कार्ड ट्रान्झॅक्शन सुरक्षित करण्यासाठी ही सेवा सुरु करण्यास सांगितलं आहे. हे वाचा : Paytm वर आता काढू शकता जीवन विमा, योजना नेमकी काय आहे? याशिवाय रिझर्व्ह बँकेने इतर सेवाही सुरु केल्या आहेत. यामध्ये डोमेस्टिक, इंटरनॅशनल, पीओएस ट्रान्झॅक्शन, एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिट ऑन/ऑफ करण्याची सुविधाही सुरु केली आहे. कार्डवरून कोणतेही व्यवहार किंवा बदल झाले तर झाले तर कार्ड होल्डरच्या मोबाइल नंबर, मेलवर अलर्ट पाठवण्याची सेवाही पुरवण्यात येणार आहे. हे वाचा : 1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर, GSTचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या