Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जिओची धमाकेदार ऑफर! 350 जीबी डेटा वर्षभर वापरा, लाँच केले नवीन प्लॅन

जिओची धमाकेदार ऑफर! 350 जीबी डेटा वर्षभर वापरा, लाँच केले नवीन प्लॅन

रिलायन्स जिओने लाँग टर्मसाठी तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस फ्री दिले आहेत.

रिलायन्स जिओने लाँग टर्मसाठी तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस फ्री दिले आहेत.

रिलायन्स जिओने लाँग टर्मसाठी तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस फ्री दिले आहेत.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 08 मार्च : टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी टेरिफ चार्ज वाढवल्यानंतर ग्राहकांसाठी खास ऑफर दिल्या जात आहेत. यात लाँग टर्म रिचार्जचे प्लॅन आहेत. रिलायन्स जिओने त्यांचा एक वर्षासाठीचा 4999 रुपयांचा प्लॅन पुन्हा दिला आहे. टेरिफ रिचार्जचे दर वाढल्यानंतर कंपनीने हा प्लॅन बंद केला होता. आता जिओने तीन लाँग टर्म प्लॅन लाँच केले आहेत. यात 4999 रुपयांसह 1299 आणि 2121 रुपयांचे प्लॅन आहेत.

4999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 350 जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा कोणत्याही डेटा लिमिटशिवाय असेल. तसेच प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग तर इतर नेटवर्कसाठी 12 हजार मिनिटे दिली जाणार आहेत. 360 दिवसांच्या मुदतीसाठी असलेल्या प्लॅनमध्ये दररोज 100 फ्री एसएमएस असतील. त्याशिवाय जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

जिओने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये दररोज दीड जीबी डेटाची ऑफर असलेला 2121 रुपयांचा प्लॅन आहे. 336 दिवसांची मुदत असलेल्या या प्लॅनवर जिओ टू जिओ अनलिमिटेड तर इतर नेटवर्कसाठी 12 हजार मिनिटे कॉलिंगसाठी मिळणार आहेत. यात दररोज 100 एसएमएस मिळतील.

हे वाचा ...तर तुम्हाला 16 मार्चपासून ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही

लाँग टर्मसाठी सर्वात स्वस्त असा 1299 रुपयांचा प्लॅन जिओने दिला आहे. यामध्ये 3600 एसएमश सह 24 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. 336 दिवसांच्या मुदतीसाठी हा प्लॅन आहे. यामध्ये जिओ टू जिओ फ्री कॉलिंग असेल त्यासोबत इतर नेटवर्कवर 12 हजार मिनिटे कॉलिंगसाठी मिळतील. या दोन्ही लाँग टर्म प्लॅनवर जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

हे वाचा : Jio ची बेस्ट ऑफर! 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार दुप्पट फायदा

First published:

Tags: Reliance Jio, Technology