Home /News /technology /

Vodafone Idea ग्राहकांना लॅपटॉप, बाइक, मोफत दुबई फिरण्याची संधी; करावं लागेल हे एक काम

Vodafone Idea ग्राहकांना लॅपटॉप, बाइक, मोफत दुबई फिरण्याची संधी; करावं लागेल हे एक काम

Vodafone-Idea ने आपल्या T20 फॅन्ससाठी Play Along एडिशन लाँच केलं आहे. ही ऑफर 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत असेल. या ऑफरमध्ये युजर्सकडे लॅपटॉप, स्मार्टफोन आणि बाइक जिंकण्याची संधी आहे.

  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : IPL 2021 ची सुरुवात झाली आहे. अशात टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आपल्या T20 फॅन्ससाठी Play Along एडिशन लाँच केलं आहे. यात युजर्सकडे अनेक गोष्टी जिंकण्याची संधी आहे. कंपनीची ही ऑफर 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत असेल. या ऑफरमध्ये युजर्सकडे लॅपटॉप, स्मार्टफोन आणि बाइक जिंकण्याची संधी आहे. टेलिकॉम कंपनी VI ने Vi App वर T20 पाहा, खेळा आणि जिंका अशी घोषणा केली आहे. वोडाफोन-आयडिया युजर्स एकटे किंवा आपल्या मित्रांसोबत गेम खेळू शकतात. 26 दिवस चालणाऱ्या 30 लाइव्ह मॅचदरम्यान कोणत्याही एका मॅचदरम्यान बक्षिस जिंकण्याची संधी आहे. Vodafone-Idea ने T20 साठी Disney+Hotstar सह करार केला आहे, जेणेकरुन Vi ग्राहक आपल्या सुविधेनुसार आपल्या स्मार्टफोनमध्ये लाइव्ह मॅच पाहू शकतील. हा Play Along गेम Vodafone-Idea चे प्रीपेड तसंच पोस्टपेड दोन्ही ग्राहक खेळू शकतात. यासाठी Vi App च्या होम पेजवर वन-टाइम रजिस्ट्रेशन करावं लागेल. प्रत्येक सामन्यानुसार दररोज प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. या गेममध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना त्यांचा अंदाज लावला लागतो. टॉस कोण जिंकेल, मॅच कोण जिंकेल, पुढच्या ओवरमध्ये किती रन केले जातील असा अंदाज युजर्सला लावावा लागेल. या गेममध्ये भाग घेणाऱ्यांना गेममध्ये जिंकण्यासाठी Cricket Gyan चा वापर करावा लागेल. गेम संपल्यानंतर लीडर बोर्ड पब्लिश केला जाईल. दररोज विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाईल. गेममध्ये सहभागी झालेले 26 दिवसांच्या काळात कितीही वेळा जिंकू शकतात.

  IPL 2021: शिखर धवनचा सलग 6 व्या वर्षी रेकॉर्ड, विराट-रोहितला टाकलं मागं

  त्याशिवाय गेममध्ये भाग घेणारे आपली League ही बनवू शकतात आणि एकमेकांविरोधात स्पर्धा करू शकतात. आपल्या मित्रांना, कुटुंबीयांनाही मॅच खेळण्यासाठी इंवाइट करता येईल. दररोजच्या बक्षिसांमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, आयपॅड, स्पोर्ट्स बाइक आणि दुबईमध्ये मोफत फिरण्याची संधी मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: IPL 2021, Vodafone, Vodafone services

  पुढील बातम्या