• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : ऋषभ पंत विराटची 'स्टाईल' मारायला गेला आणि तोंडावर आपटला!

IPL 2021 : ऋषभ पंत विराटची 'स्टाईल' मारायला गेला आणि तोंडावर आपटला!

कोरोनाच्या संकटातही आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडचा दिल्ली आणि हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यातला सामना सुरू झाला.

 • Share this:
  दुबई, 22 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटातही आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडचा दिल्ली आणि हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यातला सामना सुरू झाला. या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. एनरिच नॉर्कियाने डेव्हिड वॉर्नरला (David Warner Out) पहिल्याच ओव्हरला शून्यवर आऊट केलं. एप्रिल 2016 नंतर वॉर्नर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये शून्य रनवर आऊट झाला. वॉर्नरची विकेट गेल्यानंतर पुढच्याच बॉलला दिल्ली कॅपिटल्सने केन विलियमसनची विकेट मिळवण्यासाठी अति उत्साहात डीआरएस (DRS) घेतला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्टाईलमध्ये अगदी अखेरच्या क्षणी डीआरएस घेण्यासाठी हात वर केला. विलियमसनच्या बॅटला बॉल लागलेला असतानाही दिल्लीने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं होतं. रिव्ह्यू घेतल्यानंतरही अल्ट्रा एजमध्ये विलियमसनच्या बॅटला बॉल लागल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे दिल्लीने पहिल्याच ओव्हरमध्ये एक रिव्ह्यू गमावला. दिल्ली-हैदराबाद मॅचवर कोरोनाचं संकट दिल्ली आणि हैदराबाद या सामन्यावर सुरुवातीला कोरोनाचं संकट होतं, कारण हैदराबादचा डावखुरा फास्ट बॉलर टी नटराजन याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. नटराजनच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना आयसोलेट व्हावं लागलं आहे, यात ऑलराऊंडर विजय शंकरचाही समावेश आहे. हैदराबादच्या इतर खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर या मॅचला सुरुवात झाली. IPL 2021 : आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची घुसखोरी, तरी होणार आजचा सामना, कारण... पॉईंट्स टेबलची स्थिती आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) दिल्लीची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादविरुद्धचा सामना जिंकून दिल्लीला पहिला क्रमांक गाठता येईल. दिल्लीने 8 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर हैदराबादची अवस्था अत्यंत बिकट आहे. हैदराबादची टीम पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या क्रमांकावर आहे. या मोसमात हैदराबादला 7 पैकी एकच सामना जिंकता आला, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. सध्या 2 पॉईंट खात्यात असलेल्या हैदराबादला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेल्या सातही मॅच जिंकाव्या लागणार आहेत.
  Published by:Shreyas
  First published: