मुंबई, 23 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) बुधवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) 8 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीचा ओपनिंग बॅटर शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं टीमला चांगली सुरुवात करत हा विजय सोपा केला. धवननं 37 बॉलमध्ये 42 रन काढले. त्यानं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 422 रन काढले असून सर्वाधिक रन काढण्यासाठी मिळणारी ऑरेंज कॅप पुन्हा एकदा पटकावली आहे.
धवननं या खेळीच्या दरम्यान एक रेकॉर्ड देखील केला. त्यानं सलग सहाव्या आयपीएल सिझनमध्ये 400 पेक्षा जास्त रन केले आहेत. आता या यादीत त्याच्या पुढे फक्त डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सुरेश रैना (Suresh Raina) आहेत. या दोघांनी सलग सात आयपीएलमध्ये 400 पेक्षा जास्त रन केले आहेत.
शिखर धवननं एकूण 8 वेळा एका आयपीएल सिझनमध्ये 400 पेक्षा जास्त रन केले आहेत. या यादीत त्याच्यापेक्षा पुढं फक्त सुरेश रैना आहे. रैनानं 9 आयपीएल सिझनमध्ये ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी प्रत्येकी 7 वेळा ही कामगिरी केली आहे. धवननं आता या दोघांना मागं टाकलं आहे.
दिल्लीच्या बॉलरनं टाकला सर्वात फास्ट बॉल, रॉकेटच्या वेगानं केली हैदराबादची चाळण
ऑरेंज कॅपची शर्यत
दिल्ली कॅपिटल्सचा ओपनिंग बॅटर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे. पृथ्वीनं या सिझनमध्ये आजवर 319 रन काढले आहेत. पंजाब किंग्जचा कॅप्टन केएल राहुल 8 मॅचमध्ये 380 रन करत दुसऱ्या तर त्याचा सहकारी मयांक अग्रवाल 327 रन काढून तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेचा फाफ ड्यू प्लेसिस 8 मॅचमध्ये 320 रनसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर सीएसकेचाच ऋतुराज गायकवाड 284 रनसह सहाव्या क्रमांकावर आहे.
हैदराबादविरुद्धच्या या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर गेली आहे. दिल्लीने 9 पैकी 7 सामने जिंकले असून फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या खात्यात आता 14 पॉईंट्स आहेत, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Shikhar dhawan