मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

खास फ्रंट कॅमेरा असणारा जगातला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

खास फ्रंट कॅमेरा असणारा जगातला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

 Vivo V21 फोन 44 मेगापिक्सल OIS फ्रंट कॅमेरासह येणारा हा जगातला पहिला स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे.

Vivo V21 फोन 44 मेगापिक्सल OIS फ्रंट कॅमेरासह येणारा हा जगातला पहिला स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे.

Vivo V21 फोन 44 मेगापिक्सल OIS फ्रंट कॅमेरासह येणारा हा जगातला पहिला स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 6 मे : स्मार्टफोन कंपनी विवोने गेल्या काही दिवसांपूर्वी Vivo V21 हा स्मार्टफोन लाँच केला होता. विवोच्या या स्मार्टफोनचा गुरुवारपासून भारतात सेल सुरू झाला आहे. Vivo V21 फोन 44 मेगापिक्सल OIS फ्रंट कॅमेरासह येणारा हा जगातला पहिला स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे. Vivo V21 स्मार्टफोन कंपनीच्या रिटेल पार्टनर्स, फ्लिपकार्ट आणि विवो इंडियाच्या ई-स्टोरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. विवोचा हा स्मार्टफोन 2 वेरिएंटमध्ये असून यांची किंमत अनुक्रमे 29,990 रुपये आणि 32,990 रुपये आहे. कंपनीने Vivo V21 स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स आणि स्किमची घोषणा केली आहे. HDFC कार्डचा वापर करुन या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे. त्याशिवाय V-Shield स्किमअंतर्गत सर्व प्रकारच्या डॅमेजवर कंप्लीट मोबाईल प्रोटेक्शनचा फायदा मिळतो आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये 3000 रुपयांची सूट आहे. तसंच 12 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI ऑप्शन मिळतो आहे. ऑफलाईन ऑफर्समध्ये सर्व प्रकारच्या डॅमेजवर कंप्लीट मोबाईल प्रोटेक्शनसह HDFC आणि कोटक बँक कार्ड्सवर 10 टक्क्यांचा कॅशबॅक आहे. HDFC आणि कोटक बँक कार्डवर 2500 रुपयांचा कॅशबॅक आणि वन-टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट ऑफर आहे.

(वाचा - केवळ Apple चा Logo नाही, हे तर आणखी एक बटण! वाचा iPhone च्या लेटेस्ट अपडेटबाबत)

Vivo V21 स्पेसिफिकेशन्स - - 6.44 इंची HD+ E3 एमोलेड डिस्प्ले - डिस्प्ले 90 Hz रिफ्रेश रेट - MediaTek Dimensity 800U प्रोसेसर - 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज - माइक्रो एसडी कार्डद्वारे फोन स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो. - अँड्रॉईड 11 बेस्ड Funtouch OS11.1 ऑपरेटिंग सिस्टम - 4,000 mAh बॅटरी - 33W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट - इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर

(वाचा - Google Map द्वारे शोधा हरवलेला स्मार्टफोन; अशी होईल मदत)

कॅमेरा - फोनला 44 मेगापिक्सल OIS सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला रियर 64 मेगापिक्सल मेन कॅमेरा आहे. तसंच 8 मेगापिक्सल वाईड अँगल लेन्स असून Bokeh सेंसर देण्यात आला आहे. त्याशिवाय 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे.
First published:

Tags: Smartphone, Vivo

पुढील बातम्या