जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता फोनमधूनच निघणार ड्रोन कॅमेरा, वर उडवून काढता येणार फोटो

आता फोनमधूनच निघणार ड्रोन कॅमेरा, वर उडवून काढता येणार फोटो

आता फोनमधूनच निघणार ड्रोन कॅमेरा, वर उडवून काढता येणार फोटो

Vivo ने एक ड्रोन कॅमेरा फोन पेटेंट केला आहे. फोनमध्येही ड्रोन देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो कॅमेराला तुमच्यापासून दूर वर घेऊन जाईल आणि तेथून फोटो काढू शकेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या नेहमी काही ना काही वेगळं करण्यासाठी नवे एक्सपेरिमेंट करत असतात. आधी फोनमध्ये एक कॅमेरा असायचा, आता 4-4 कॅमेरे एका फोनला असतात. सुरुवातीला 2 मेगापिक्सल कॅमेरा येत होता आणि 50-108 अशा मेगापिक्सलवर स्मार्टफोन निर्मात्यांनी काम केलं आहे. आता या सर्वांपुढे जात Vivo ने एक ड्रोन कॅमेरा फोन पेटेंट केला आहे. त्याशिवाय Xiaomi नेही एक फोन पेटेंट करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात ड्रोन कॅमेरा असेल. कसा असेल ड्रोन कॅमेरा - ड्रोन एक फ्लाइंग ऑब्जेक्ट आहे, ज्याला उडवता येतं आणि स्वत: कंट्रोलही करता येतं. सध्याच्या काळात फोटोग्राफर विशेष समारंभात एक फ्लाइंग ऑब्जेक्ट अर्थात ड्रोनचा वापर करतात, जेणेकरुन ते प्रत्येक अँगलने फोटो घेऊ शकतील, व्हिडीओ तयार करू शकतील. फोनमध्येही अशाप्रकारचा ड्रोन देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो कॅमेराला तुमच्यापासून दूर वर घेऊन जाईल आणि तेथून फोटो काढू शकेल. अशी टेक्नोलॉजी आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये नाही. ड्रोन कॅमेरा फोनमध्ये, ड्रोन आणि कॅमेरा हार्डवेअर फोनपासून वेगळं असण्याची शक्यता आहे. हार्डवेअर फोनसह लावल्यास, समस्या येऊ शकतात. फोन तुटू शकतो किंवा कॅमेरा अडकूही शकतो. पुढे येणाऱ्या या ड्रोनमध्ये एक वेगळी बॅटरी असेल, ज्याला वेगळं चार्ज करता येईल. कंपनीने या फोनच्या बनावटीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. काही जाणकारांनी ड्रोन कॅमेरा फोनला 3D मध्ये डिझाइन करुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे पॉप-अप कॅमेरा निघतो, त्याप्रमाणे ड्रोनदेखील निघेल आणि तो फोनपासून वेगळा केला जाईल.

या फोनमध्ये फोटो काढून 3 लाख जिंकण्याची संधी,असं करा अप्लाय आणि जिंका बंपर गिफ्ट

200 मेगापिक्सल कॅमेरा - ड्रोनचा वापर होणारा कॅमेरा 200 मेगापिक्सलचा असू शकतो असा अंदाज आहे. फोटो लांबून घ्यावा लागत असल्याने त्याची स्पष्टता अधिक असण्यासाठी या मेगापिक्सलचा वापर केला जाऊ शकतो. आतापर्यंत फोनची स्पष्ट डिझाइन समोर आली नसून याच्या किंमतीचा अंदाजही देण्यात आलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात