नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : Xiaomi ने वार्षिक आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी कॉन्टेस्टची घोषणा केली आहे. याचं नाव Xiaomi Imagery Awards 2021 आहे. जर तुम्हाला मोबाईल फोटोग्राफीमध्ये आवड असेल, आणि तुमच्याकडे या कंपनीचा स्मार्टफोन असेल, तर तुम्ही कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकता. कॉन्टेस्टमध्ये जिंकून पुरस्कार मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे.
या कॉन्टेस्टची थीम हॅपी मोमेंट्स आहे आणि फोटो सबमिट करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला इव्हेंट पेजवर जावं लागेल आणि विषय समजून एक फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करावा लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, क्लिक केलेला फोटो Xiaomi किंवा Redmi स्मार्टफोनमधीलच असावा.
एकूण तुम्ही अधिकतर 20 फोटो आणि 5 व्हिडीओ पाठवू शकतात. फोटो साइज 300KB आणि 30MB दरम्यान असावी आणि त्यात EXIF माहिती असावी. व्हिडीओ MP4 फॉर्मेटमध्ये असावा. 1 मिनिटहून अधिक आणि 500MB हून अधिक साइज असू नये.
हे कॉन्टेस्ट जगभरातील प्रसिद्ध फोटोग्राफर्सच्या एका ग्रुपकडून आजोजित करण्यात आलं आहे. विजेत्यांना 5000 डॉलर अर्थात 3,72,514 रुपये मिळतील.
पहिले 10 फोटो पाहिले जातील आणि यात जिंकणाऱ्यांना Xiaomi Mi 11 T आणि Xiaomi 11T Pro फोनसह इतरही काही गोष्टी दिल्या जातील.
दरम्यान, तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, फोटो काढण्यासाठी चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 108 मेगापिक्सलचा कॅमेरा स्मार्टफोन बजेटमध्ये खरेदी करता येऊ शकतो. Xiaomi चा Mi 10i 5G फोन Amazon वर कमी किंमतीत खरेदी करता येईल.
हा फोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज, तसंच 8GB+128GB अशा दोन वेरिएंटमध्ये येतो. याची किंमत 21,999 रुपये आहे. परंतु SBI क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना या फोनवर इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.