मुंबई, 13 ऑक्टोबर : स्मार्टफोन कंपनी व्हिवोने (Vivo) आज भारतात आपला नवा फोन Vivo V20 लॉन्च केला आहे. हा फोन एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Vivo V20 फोन गेल्या महिन्यात थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला होता. व्हिवो V20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसारखे प्रीमियम फिचर्स देण्यात आले आहेत. भारतात व्हिवोच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत 25 हजारांपर्यंत असू शकते.
वाचा - Xiaomi लॉन्च करणार कंप्यूटराईज Face Mask; जाणून घ्या काय असेल खास
काय आहेत स्पेसिफिकेशन्स (Vivo V20 specifications ) -
फोनला 1080x2400 पिक्सल रिजॉल्यूशनसह 6.44 इंची फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G SoC प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉईड 11 वर बेस Funtouch OS 11 वर काम करतो.
वाचा - Amazon-Flipkart सेलमध्ये 6000 हूनही कमी किंमतीत मिळतोय हा जबरदस्त smart TV
कॅमेरा -
फोटोसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. त्याशिवाय 8 मेगापिक्सल वाईड अँगल शूटर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसंच फोनला 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 55 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.