मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'या' दिवशी लॉन्च होणार Appleचा iPhone 12; मार्केटमध्ये येण्याआधीच किंमत लीक

'या' दिवशी लॉन्च होणार Appleचा iPhone 12; मार्केटमध्ये येण्याआधीच किंमत लीक

Appleने बहुप्रतिक्षित सीरीज  iPhone 12 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. लॉन्चिंग इव्हेंटआधी iphone 12 मॉडेलच्या किंमतीचा, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफिशियल डेब्यूचा खुलासा झाला आहे.

Appleने बहुप्रतिक्षित सीरीज iPhone 12 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. लॉन्चिंग इव्हेंटआधी iphone 12 मॉडेलच्या किंमतीचा, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफिशियल डेब्यूचा खुलासा झाला आहे.

Appleने बहुप्रतिक्षित सीरीज iPhone 12 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. लॉन्चिंग इव्हेंटआधी iphone 12 मॉडेलच्या किंमतीचा, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफिशियल डेब्यूचा खुलासा झाला आहे.

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : Appleने बहुप्रतिक्षित सीरीज iPhone 12 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. कंपनी 13 ऑक्टोबरला एका स्पेशल इव्हेंटमध्ये iPhone 12 लॉन्च करणार आहे. यासाठी मीडिया इन्व्हिटेशन पाठवलं जात आहे. इन्व्हिटेशन कार्डवर 'Hi, Speed' असं लिहिलेलं आहे. कोरोना व्हायरसमुळे हा इव्हेंट व्हर्च्युअल होणार आहे. लॉन्चिंग इव्हेंटआधी iphone 12 मॉडेलच्या किंमतीचा, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफिशियल डेब्यूचा खुलासा झाला आहे. iPhone 12 लाईनअपचे डिटेल्स चीनी मायक्रोब्लॉगिंग साईट Weiboवर लीक झाले आहेत.

हे फोन लॉन्च होण्याची शक्यता -

Apple चा लॉन्च इव्हेंट 13 ऑक्टोबरला भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10 वाजता होणार आहे. कॅलिफोर्नियातील ऍपलच्या हेडक्वॉर्टर Apple Park मध्ये इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. apple live event कंपनी वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. रिपोर्टनुसार, Apple iPhoneच्या नव्या iphone 12 सीरीजमध्ये चार स्मार्टफोन डेब्यू करू शकतात. या सीरीजमध्ये iphone 12 mini, iphone 12, iphone 12 pro आणि iphone 12 pro Max यांचा समावेश असू शकतो.

हे वाचा - MI फेस्टिव्हल सेल; केवळ 1 रुपयात खरेदी करू शकता स्मार्टफोन, टीव्ही

किंमत -

रिपोर्टनुसार, iPhone 12 mini-699 डॉलर जवळपास 51000 रुपयांपर्यंत असू शकतो. iPhone 12-799 डॉलरनुसार 58300 रुपये, iPhone 12 Pro-999 डॉलर जवळपास 73000 रुपये आणि iPhone 12 Pro Max-1,099 डॉलर म्हणजेच 80,400 रुपयांपर्यंत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

हे वाचा - Diwali Offer! Apple कडून 18,900 रुपयांचे AirPods फ्री

फिचर्स -

रिपोर्टनुसार, हे चारही स्मार्टफोन OLED Super Retina XDR डिस्पलेसह असण्याची शक्यता आहे. तसंच 5G टेक्नोलॉजी असण्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय सिरॅमिक शील्ड ग्लास कव्हर, Smart Data Mode, 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टही असू शकतो.

हे वाचा - आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत iPhone 11; कुठे आणि कधी मिळणार पाहा

iPhone 12 mini स्मार्टफोनला 5.4 इंची डिस्पले आणि ड्यूयल रियर कॅमेरा, वाईड आणि अल्ट्रा-वाईड अँगल लेंस असेल. iPhone 12 स्मार्टफोन 6.1 इंची डिस्प्ले साईज, ट्रिपल कॅमेरा सपोर्टसह येईल. तर iPhone 12 Pro Maxला 6.7 इंच डिस्प्लेसह, ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Iphone