Xiaomi लॉन्च करणार कंप्यूटराईज Face Mask; जाणून घ्या काय असेल खास
Xiaomi लॉन्च करणार कंप्यूटराईज Face Mask; जाणून घ्या काय असेल खास
संग्रहित फोटो
कंपनीने ट्विटरवरुन फेस मास्क लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे. शाओमीने या पोस्टमध्ये 'Breathe safely, live healthy. Coming to protect you' असा मेसेजही दिला आहे.
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : शाओमी Xiaomi आपल्या प्रोडक्ट्स लिस्टमध्ये आणखी एका प्रोडक्टचं नाव सामिल करणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मास्क सर्वात महत्त्वाचं आणि तितक्यात गरजेच्या वस्तूंमध्ये सामिल आहे. 13 ऑक्टोबर रोजी Xiaomi फेस मास्क लॉन्च करणार आहे. कंपनीने ट्विटरवरुन फेस मास्क लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे.
शाओमीने या पोस्टमध्ये 'Breathe safely, live healthy. Coming to protect you' असा मेसेजही दिला आहे. यावर्षी मार्चमध्ये शाओमीला नव्या फेस मास्कचं पेटेंट मिळालं होतं.
वाचा - आता ATM प्रमाणे होणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेसकाय आहेत या मास्कचे फिचर्स -
- हे मास्क थ्री डायमेंशनल फ्रेम डिझाईनचं आहे. या डिझाईनमुळे मास्क चेहऱ्यावर पूर्णपणे फिट बसतं.
- मास्कच्या सपोर्ट फ्रेमच्या शेपला, शेपिंग पार्टवर प्रेस करून बदलता येऊ शकतं.
- शाओमीला पेटेंट एजेन्सीने (USPTO) स्मार्ट मास्कचंही पेटेंट दिलं आहे.
Breathe safe, live healthy. ✅
Coming to protect you.
Unveiling on 13th October.
RT if you know what's coming. pic.twitter.com/nTALg5Cgxx
- यात एक प्रोसेसर आहे, जो मास्क सेंसरमधून संपूर्ण डेटा ऍनालाईज करतो.
- एवढंच नाही, तर या मास्कमध्ये कॅल्क्युलेट केलेला डेटा स्टोर करण्यासाठी एक स्टोरेज सिस्टमही देण्यात आलं आहे.
- मास्कला बॅटरी आणि कनेक्टरही आहे.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.