Google वर शेवटचं काय सर्च केलं होतं? विराटने स्वत:चं केला खुलासा

विराटने त्याच्या क्वारंटाईन काळात इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं, ज्यात त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरही दिली.

विराटने त्याच्या क्वारंटाईन काळात इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं, ज्यात त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरही दिली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 जून : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईत आपला क्वारंटाईन पीरियड पूर्ण केला. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीम 2 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल मॅच खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाली आहे. पण मुंबईत विराटने त्याच्या क्वारंटाईन काळात इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं, ज्यात त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरही दिली. विराटने आपल्या डाएटसह त्याच्या लहानपणीचे फोटोही या सेशनमध्ये शेअर केले होते. यावेळी त्याने Google वर शेवटचं काय सर्च केलं होतं, याबाबतही सांगितलं. विराटला इन्स्टाग्राम सेशनमध्ये एका चाहत्याने त्याने शेवटचं गुगलवर काय सर्च केलं होतं, असा प्रश्न विचारला होता. त्यावर विराटने, फुटबॉल दिग्गज खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronald) ट्रान्सफरबाबत सर्च केलं असल्याचं सांगितलं. रोनाल्डो फुटबॉल इतिहासातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने प्रीमियर लीग, ला लीगा (LaLiga), सीरी ए (Serie A) तीनही प्रमुख लीगमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्याने सीजन पूर्ण केला.

  (वाचा - हाय सिक्योरिटी असूनही कसे लीक होतात WhatsApp Chat, वाचा काय आहे कारण)

  पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू रोनाल्डोची लोकप्रियचा जगजाहीर आहे. हेच कारण आहे, की प्रत्येकाला त्याच्याबदद्ल जाणून घ्यायचं आहे.

  (वाचा - Google काही सेकंदात सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? यामागे काय असते प्रोसेस)

  तसंच, इन्स्टाग्राम सेशनदरम्यान एका चाहत्याने कोहलीला कोणता माजी वेगवान बॉलर आहे, जो तुला अडचणीत आणू शकेल, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना विराटने पाकिस्तानच्या माजी वेगवान बॉलर वसीम अक्रमचं नाव घेतलं होतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: