Home /News /technology /

VI ची धमाकेदार ऑफर; मिळणार मोफत हायस्पीड इंटरनेट, जाणून घ्या या प्लॅनबाबत

VI ची धमाकेदार ऑफर; मिळणार मोफत हायस्पीड इंटरनेट, जाणून घ्या या प्लॅनबाबत

Vodafone - Idea: व्होडाफोन (Vodafone) आणि आयडिया (Idea) या मोठ्या कंपन्यांचं विलीनीकरण झाल्यानंतर त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन हाय स्पीड इंटरनेट ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : गेल्या काही वर्षांपासून मोबाइल सेवा पुरवठादारांमधील स्पर्धा वाढत चालली आहे. स्मार्टफोनचा वापर वाढल्यानंतर तर ही स्पर्धा अधिकच वाढली आहे. मोठ्या स्पर्धेमुळे ग्राहकांना अधिक सेवा कमी पैशांत मिळू लागल्या आहेत. अलीकडेच व्होडाफोन (Vodafone) आणि आयडिया (Idea) या मोठ्या कंपन्यांचं विलीनीकरण झाल्यानंतर तयार झालेल्या Vi या कंपनीने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि असलेले ग्राहक टिकवण्यासाठी एक नवी ऑफर आणली आहे. मध्यरात्री 12 ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या काळात हाय-स्पीड इंटरनेट सेवा अमर्यादित (Unlimited Hi-speed internet) स्वरूपात दिली जाणार आहे आणि तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता. म्हणजेच ही सेवा जवळपास मोफतच उपलब्ध आहे. ही सेवा प्रीपेड (Prepaid) ग्राहकांसाठी असून, कमीत कमी 249 किंवा त्याहून अधिक रुपयांच्या प्लॅन्ससाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांनाच ही सेवा दिली जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. 'इंडिया टुडे'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

(वाचा - Instagram Alert! मित्रांना असा मेसेज केल्यास थेट बंद होणार तुमचं अकाउंट)

स्मार्टफोनद्वारे इंटरनेटचा (Internet) वापर सर्वच वयोगटातल्या व्यक्ती करत असल्या, तरी तरुणाईकडून हा वापर जास्त प्रमाणात आणि रात्रीच्या वेळी केला जातो. त्यामुळे रात्रीच्या काळात ही सेवा देण्यात आली आहे. या सुविधेची माहिती देण्याकरिता Vi कंपनीने प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. 'महामारीने सगळ्या जगात हलकल्लोळ माजवलेला असताना मोबाइल इंटरनेटने वेळ घालवण्यासाठी, लोकांसाठी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे रात्रीच्या वेळात अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध केल्यामुळे Vi च्या ग्राहकांना त्यांच्या वेळाचा अधिक सदुपयोग करता येईल. दिवसाच्या डेटाचा (Data) कोटा न संपवता रात्रीच्या वेळी जास्त वेळाचे व्हिडीओ कॉल्स (Video Calls) करता येतील, डाउनलोड्स शेड्युल करता येतील, अमर्यादित इन्फोटेन्मेंट करता येईल,' असं त्या पत्रकात म्हटलं आहे.

(वाचा -  तुम्हालाही येतात Spam mail? पाहा कसा घ्यायचा पाठवणाऱ्याचा शोध आणि कसं करायचं ब्लॉक?)

विविध प्रकारच्या ओटीटी अ‍ॅप्लिकेशन्समधून विविध प्रकारचा कंटेंट डाउनलोड करण्यासाठी, Vi मूव्हीज अँड टीव्ही अ‍ॅपचा वापर करण्यासाठी रात्रीच्या वेळच्या या अमर्यादित इंटरनेट सेवेचा वापर करता येईल, असं Vi ने स्पष्ट केलं आहे. Vi मूव्हीज अँड टीव्ही अ‍ॅप Vi च्या एक कोटीहून अधिक ग्राहकांनी डाउनलोड केलं आहे. त्याद्वारे 13 विविध भाषांतले 9500 हून चित्रपट, 400 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स, अनेक ओरिजिनल वेब सीरिज आणि इंटरनॅशनल टीव्ही शोज पाहता येतात. याशिवाय Vi ने ग्राहकांना डेटा साठवण्याचीही सुविधा दिली आहे. त्यांच्या रोजच्या डेटाच्या कोटामधला शिल्लक राहिलेला डेटा वीकेंडच्या दिवशी वापरता येणार आहे. त्या सुविधेला वीकेंड रोलओव्हर डेटा असं नाव असून, ती सुविधा एप्रिल 2021पर्यंत आहे. 299, 499 आणि 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये ग्राहकांना दुप्पट डेटा देणारी Vi ही सध्या तरी एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीने सध्या ग्राहकांवर सुविधेचा जणू वर्षावच केला आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: High speed internet, Internet, Technology, Vodafone, Vodafone idea tariff plan, Vodafone services

पुढील बातम्या