नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : पॉप्युलर फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम (Instagram) आता आपल्या पॉलिसी अधिक कठोर करणार आहे. द्वेष पसरवणारी भाषणं, अपशब्द आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्राम नवीन पॉलिसीवर काम करत आहे. युजर्सला द्वेष पसरवणारी भाषणं, अपशब्द डायरेक्ट मेसेजमध्ये (DM) येत असल्यास, पाठवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशाप्रकारच्या अकाउंट्सला डिसेबल करणार, जे मेसेजद्वारे अपशब्द आणि द्वेष करणारे मेसेज पाठवतात.
याप्रकरणी इन्स्टाग्रामने सांगितलं की, अपशब्द, अभद्र भाषा, द्वेषयुक्त भाषाणाविरोधात आमचे नियम वंश किंवा धर्मासह लोकांच्या संरक्षित वैशिष्ट्यांवर आधारित अशाप्रकारच्या हल्ल्यांना सहन करणार नाही. कोणत्याही युजरने या पॉलिसीचे नियम मोडले, तर त्या युजरचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलं जाईल असं इन्स्टाग्रामने सांगितलं आहे.
इन्स्टाग्राम आता त्यांच्या पॉलिसी अधिक कठोर करणार आहे. या पॉलिसीअंतर्गत एखाद्या युजरने अपशब्द असलेले मेसेज किंवा एखाद्या पोस्टवर अशाप्रकारच्या कमेंट केल्याच्या तक्रार आल्यास, त्या युजरचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद होईल.
(वाचा - आता Facebook ही लाँच करणार Smart Watch; जाणून घ्या काय असतील फीचर्स)
युजर अपमानास्पद मेसेज पाठवल्याबद्दल दोषी आढळल्यास, काही काळासाठी त्यावर बंदी घातली जाईल. त्यानंतरही त्याने सतत द्वेषयुक्त मेसेज पाठवल्यास, त्याचं अकाउंट कायमचं बंद केलं जाईल.
Hate Speech Controls
इन्स्टाग्राम अशाही अकाउंट्सवर बंदी आणणार आहे, जी खास अपशब्द बोलण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. इन्स्टाग्राम Hate Speech Controls मॅकेनिजमला अधिक मजबूत करत आहे. बिजनेस तसंच पर्सनल अकाउंटसाठीही हे फीचर वापरण्यात येणार आहे.