Home /News /technology /

तुम्हालाही येतात Spam mail? पाहा कसा घ्यायचा पाठवणाऱ्याचा शोध आणि कसं करायचं ब्लॉक?

तुम्हालाही येतात Spam mail? पाहा कसा घ्यायचा पाठवणाऱ्याचा शोध आणि कसं करायचं ब्लॉक?

तुम्हाला येत असलेले मेल ( E-mail) नक्की कुठून येतात? कोण पाठवतं? नको असलेले मेल्स कसे ब्लॉक करायचे याबद्दल जाणून घ्या.. स्टेप बाय स्टेप

    नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: आपल्यापैकी बरेच जण हे त्यांचे मेल आयडी ( mail ID ) ऑफिशियल कामासाठी वापरत असतात. त्यासाठी त्यांना दिवसातून बऱ्याचदा त्यांचा मेल बॉक्स चेक करत राहावा लागतो. पण कामाच्या मेल शिवाय काही मेल असे देखील असतात जे अनोळखी आयडी वरून तुम्हाला आलेले असतात. आपण कामाच्या गडबडीत त्याकडे दुर्लक्ष करतो पण ते मेल मात्र पुन्हा पुन्हा येतच राहतात. आणि अशा वेळी आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. तर असे मेल नक्की तुम्हाला कोण पाठवतं? पाठवणाऱ्याचा पत्ता कसा शोधून काढायचा आणि हे असे स्पॅम मेल (Spam mail) ब्लॉक कसे करायचे ते आपण माहिती करून घेऊ या. पाठवणाऱ्याचा पत्ता कसा शोधून काढायचा: आपल्याकडे ई-मेल पाठवणाऱ्याचा पत्ता (Location) जाणून घ्यायचे 3 मार्ग अहेत. त्यातील पहिला म्हणजे आयपी अड्रेस ( IP Address) ट्रॅक करणे, दुसरा ईमेल आयडी (mail ID ) शोधणे आणि तिसरा म्हणजे  फेसबुकच्या मदतीने पत्ता शोधणे. 1) IP Address: ज्या आलेल्या मेलचा पत्ता तुम्हाला शोधून काढायचा आहे त्याला ओपन करा. उघडल्यावर उजव्या कोपऱ्यात जिथे तुम्हाला वेळ दिसतेय त्यासमोरच्या तीन बिंदूंवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन छोटा बॉक्स उघडेल. त्यात ‘ show original ‘ वर क्लिक करा आणि आता एक नवीन टॅब उघडेल आणि आपल्याला IP Address माहिती होईल. आता हा आयपी अड्रेस कॉपी करून वुल्फ्राम अल्फा वर जा आणि या वेबसाईटवर IP Address टाकून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते. 2) Mail ID: दुसरी पद्धत म्हणजे ईमेल आयडी शोधणे. ज्या मेल आयडी वरून तुम्हाला मेल येत आहेत तो मेल आयडी  तुम्ही पीपीएल आणि स्पोकिओ या वेबसाइटवर वर जाऊन त्यांच्या सर्च बारमध्ये टाकू शकता. तिथून तुम्हाला पाठवणाऱ्याचा पत्ता आणि अजून बरीच माहिती मिळेल. 3) Facebook: फेसबुकच्या मदतीने सुद्धा तुम्ही पाठवणाऱ्याचा शोध घेऊ शकता. जर कोणी तुम्हाला ईमेल करत असेल तर त्यांचा ईमेल आयडी कॉपी करुन फेसबुकच्या सर्च बारवर जाऊन शोधा. जर समोरच्या व्यक्तीने त्याच ईमेल आयडीने फेसबुक आयडी तयार केला असेल तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सर्व माहिती फेसबुकवर सहजपणे मिळू शकते. कसं करायचं ब्लॉक? भरपूर वेळा आपण ऑनलाईन शॉपिंगचे मेल आणि वेगवेगळया प्रोमोशनल मेल्सनी त्रस्त होऊन जातो. पण या मेलला ब्लॉक करण अगदीच सोप्प आहे. तुम्ही दोन प्रकारे या मेल पासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता 1) Unsubscribe Mails: प्रत्येक मेलच्या शेवटी तुम्हाला ‘ Unsubscribe Mail’ असा पर्याय नक्कीच पहायला मिळेल. यापुढे जर तुम्हाला त्या कंपनीचे किंवा त्या प्रकारचे कोणतेही प्रमोशनल मेल्स नको असतील तर त्या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला ते मेल्स येण बंद होईल. 2) Block: तुम्हाला मेल मध्ये सुद्धा समोरच्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तुम्हाला नको असलेल्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे मेल तुम्ही उजव्या कोपऱ्यातल्या तीन बिंदूंवर जाऊन ब्लॉक पर्याय निवडून कायमचे बंद करू शकता. आता नको असलेल्या इमेलपासून अशा प्रकारे तुम्ही सुटका करून घ्या किंवा सरळ त्या सेंडरला ब्लॉक करा.
    Published by:news18 desk
    First published:

    Tags: Digital services, Gmail, Google, Social media, Spam mails, Technology

    पुढील बातम्या