मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /अमेरिका बेस्ड CCTV कंपनीला हवेत भारतीय कर्मचारी, या अटींवर मिळणार नोकरी

अमेरिका बेस्ड CCTV कंपनीला हवेत भारतीय कर्मचारी, या अटींवर मिळणार नोकरी

अमेरिकेतील एका कंपनीने या व्यावहारिक अडचणीवर पर्याय म्हणून एक जॉब प्रोफाईल (Job Profile) तयार केलं आहे. व्हर्च्युअल सुपरविजनची नोकरी अमेरिका बेस्ड सीसीटीव्ही कंपनी लाईव्ह आय सर्व्हिलन्सने (Live Eye Surveillance) देऊ केली आहे.

अमेरिकेतील एका कंपनीने या व्यावहारिक अडचणीवर पर्याय म्हणून एक जॉब प्रोफाईल (Job Profile) तयार केलं आहे. व्हर्च्युअल सुपरविजनची नोकरी अमेरिका बेस्ड सीसीटीव्ही कंपनी लाईव्ह आय सर्व्हिलन्सने (Live Eye Surveillance) देऊ केली आहे.

अमेरिकेतील एका कंपनीने या व्यावहारिक अडचणीवर पर्याय म्हणून एक जॉब प्रोफाईल (Job Profile) तयार केलं आहे. व्हर्च्युअल सुपरविजनची नोकरी अमेरिका बेस्ड सीसीटीव्ही कंपनी लाईव्ह आय सर्व्हिलन्सने (Live Eye Surveillance) देऊ केली आहे.

    वॉशिंग्टन, अमेरिका 24 जून : कोरोनाकाळात (Corona) लोकांची नोकरीची पध्दत आणि रोजगाराच्या संधी यामध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. यापूर्वी लोक ऑफिसमध्ये जाऊन काम करत होते. आता मात्र घरुनच काम (Work From Home) करावं लागत आहे. ज्या ऑफिसेसमध्ये अधिक प्रमाणात स्टाफ होता तिथे आता कमीत कमी मनुष्यबळात काम करावं लागत आहे. अशा परिस्थितीत साईटवर न जाता तेथील पर्यवेक्षण करण्याबाबत मोठी समस्या उदभवली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे पर्यवेक्षण शक्य आहे, मात्र या यंत्रणेच्या माध्यमातून आपण सूचना देऊ शकत नाही. अमेरिकेतील एका कंपनीने या व्यावहारिक अडचणीवर पर्याय म्हणून एक जॉब प्रोफाईल (Job Profile) तयार केलं आहे. अशा प्रकारचं प्रोफाईल तुम्ही यापूर्वी ना कधी ऐकलं असेल किंवा ना कधी पाहिलं असेल.

    हा व्हर्च्युअल सुपरविजनचा (Virtual Supervision) जॉब आहे. याचाच अर्थ सुपरवायझर साईटवर उपस्थित नसेल परंतु, कामातही ढिलाई होणार नाही. तसंच चोरांपासून संरक्षणाची जबाबदारी देखील हा सुपरवायझर निभावेल. हे सर्व काम त्याला सीसीटीव्हीवरुन मॉनिटर (CCTV Monitoring) करत करावं लागणार आहे. या कामासाठी या अमेरिकी कंपनीने चांगल्या ऑफर्स देऊ केल्या आहेत.

    लाईव्ह आय सर्व्हिलन्स देतेय ही नोकरी -

    ही व्हर्च्युअल सुपरविजनची नोकरी अमेरिका बेस्ड सीसीटीव्ही कंपनी लाईव्ह आय सर्व्हिलन्सने (Live Eye Surveillance) देऊ केली आहे. या नोकरीसाठी कंपनी 399 अमेरिकी डॉलर्स म्हणजे महिना 29 हजार रुपये पगार देणार आहे. सध्या तरी याची ओपनिंग हरियाणातील कर्नाल पुरतीच मर्यादित आहे. कंपनीच्या बिझनेस फिडचं 24 तास मॉनिटरिंग करुन त्याबाबतचा अहवाल तयार करणं, ही या पदावर नोकरी करणाऱ्याची जबाबदारी असेल. लाईव्ह आय सर्व्हिलन्सच्या वेबासाईटवर जॉब ओपनिंग्ज हा सेक्शन खुला करण्यात आला असून, या जॉब पोस्टचं कंपनीने Process Analyst असं नामकरण केलं आहे.

    (वाचा - कोरोनामुळे बदलला भारतीयांचा खरेदी ट्रेंड; चारमधील एका फोनची ऑनलाईन खरेदी)

    बारीक नजर ठेवावी लागणार, आरडाओरडा करावा लागणार -

    या नोकरीसाठी मुलभूत पात्रता इयत्ता 12 वी पास अशी आहे. तसंच इच्छूक उमेदवारास बेसिक कॉम्प्युटर नॉलेज (Computer Knowledge) असणं आवश्यक आहे. कारण संपूर्ण काम हे कॉम्प्युटरच्या माध्यमातून करावं लागणार आहे. तसंच चांगलं संवाद कौशल्य आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता असावी. या कामासाठी अमेरिकेतील ही कंपनी भारतीयांनाच प्राधान्य देत आहे. तसंच त्यांना सातासमुद्रापार असलेल्या कंपनीच्या व्यवसायावरही लक्ष ठेवावं लागणार आहे. तसंच कामगार योग्य पध्दतीने काम करत आहेत की नाही यावर नजर ठेवावी लागणार आहे. कंपनीच्या कार्यक्षेत्रात चोर आल्यास जोरजोरात ओरडाआरडाही करावा लागणार आहे. तसंच घटनेची पोलिसांना माहिती दिली आहे, अशी सूचनाही द्यावी लागणार.

    (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

    ही अफलातून नोकरी देताना कंपनीने आम्हाला व्यवसायातील जोखीम कमी करायची आहे, असं स्पष्ट केलं आहे. ही नोकरी अत्यंत सतर्क राहून करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यास 7 ते 11 तास ही नोकरी करावी लागेल, तसंच त्यास आवश्यक त्या रजाही देण्यात येतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

    First published:

    Tags: Cctv, Tech news