जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Cyber Dost Alert! एका सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई, हे App चुकूनही डाउनलोड करू नका

Cyber Dost Alert! एका सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई, हे App चुकूनही डाउनलोड करू नका

Cyber Dost Alert! एका सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई, हे App चुकूनही डाउनलोड करू नका

लोन देण्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या फेक, बनावट App पासून सावध राहण्याचं सांगण्यात आलं आहे. सायबर दोस्तने सोप्या अटी आणि कमी व्याज दरात कर्ज देणाऱ्या फेक App पासून सावधानतेचा इशारा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : भारतात डिजीटल पेमेंटमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे त्याच वेगात सायबर क्राइम (Cyber Crime) प्रकरणातही मोठी वाढ होत आहे. सायबर क्रिमिनल्स नव्या-नव्या पद्धतींनी, विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. कोरोना काळात सायबर फ्रॉड प्रकरणांत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. केंद्र सरकारने लोकांना याबाबत अलर्ट केलं आहे. कर्ज देण्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या फेक, बनावट App पासून सावध राहण्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वसामान्यांना सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी सायबर दोस्त वेळोवेळी अलर्ट राहण्याची माहित देत असतं. सायबर दोस्त (Cyber Dost) गृह मंत्रालयाचं एक ट्विटर हँडल आहे, जे सायबर सुरक्षा आणि सायबर सिक्युरिटीसंबंधी माहिती शेअर करत असतं. Cyber Dost Alert - सायबर दोस्तने सोप्या अटी आणि कमी व्याज दरात कर्ज देणाऱ्या फेक App पासून सावध राहण्याचं सांगितलं आहे. सायबर दोस्तने ट्विट करत सांगितलं, की बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या Fake App पासून दूर राहा, कोणतंही App संपूर्ण तपासणीशिवाय आपल्या मोबाइलमध्ये (Fake Mobile Apps) डाउनलोड करू नका. तसंच यासंबंधी कोणतीही लिंक ओपन करू नका.

तुम्हालाही WhatsApp वर KBC चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा

गृह मंत्रालयाने सायबर दोस्तच्या माध्यमातून सांगितलं, की कर्ज देणाऱ्या कंपन्यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) वेबसाइटवर माहिती घेणं गरजेचं आहे. कर्ज देणारं कोणतंही App डाउनलोड करताना सतर्क राहा, अन्यथा तुमची खासगी माहिती, डेटा धोक्यात येऊ शकतो. कागदपत्र, पेमेंट करताना संबंधित वेबसाइट किंवा URL तपासा. Cyber Dost सायबर सुरक्षा आणि सायबर सिक्युरिटी - सायबर क्रिमिनल्स पोलिसांच्या नावाने कंप्यूटर प्रोग्रामद्वारे पॉप-अपचा वापर करतात. पॉर्नोग्राफिक कंटेंटमुळे युजरचा कंप्यूटर ब्लॉक झाल्याचा पॉप-अप सायबर क्रिमिनल्सकडून पोलिसांच्या नावाने पाठवला जातो. कंप्यूटर अनब्लॉक करण्यासाठी फाइन द्यावा लागेल असंही त्या पॉप-अपमध्ये लिहिलेलं असतं.

Gmail वर तुम्हालाही असा Mail आला का? सावधान! बँक अकाउंट येऊ शकतं धोक्यात

Cyber Dost Alert अशा प्रकारच्या नोटिशीपासून सावध राहण्याचं सायबर दोस्तकडून सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय वेळोवेळी आपला कंप्यूटर अँटीव्हायरस प्रोग्रामद्वारे क्लिक करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. तसंच पॉप-अपमध्ये पेमेंट करण्याबाबत सांगितलं गेल्यास, कोणतंही पेमेंट करू नका. तसंच पॉप-अप किंवा मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात