जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / नव्या फीचर्ससह लगेच अपडेट करा Google Chrome, मिळेल अधिक सुरक्षा

नव्या फीचर्ससह लगेच अपडेट करा Google Chrome, मिळेल अधिक सुरक्षा

नव्या फीचर्ससह लगेच अपडेट करा Google Chrome, मिळेल अधिक सुरक्षा

Google Chrome ब्राउजरमधील अर्ध्याहून अधिक त्रुटी हाय रिस्क असतात. त्यामुळेच गुगल युजर्सला आपलं वेब ब्राउजर वेळोवेळी अपडेट करण्यासाठी सांगतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मे : Google आपल्या वेब ब्राउजरसाठी नवे अपडेट जारी करत असतं. गुगला काही नव्या त्रुटी आढळल्यानंतर किंवा त्या ठीक केल्यानंतर Google नवीन अपडेटसह ते लागू करतं. Google Chrome ब्राउजरमधील अर्ध्याहून अधिक त्रुटी हाय रिस्क असतात. त्यामुळेच गुगल युजर्सला आपलं वेब ब्राउजर वेळोवेळी अपडेट करण्यासाठी सांगतं. गुगल क्रोम 102 एक असं स्टेबल अपडेट आहे, जे डाउनलोड करुन युजर ब्राउजर अपडेट करू शकतात. यात चांगल्या नेव्हिगेशनसह Web Apps File ओपन करता येतात. गुगल क्रोमने 101 लाँच केल्यानंतर क्रोम 102 लाँच केलं आहे. या लेटेस्ट अपडेटमध्ये गुगल क्रोम ब्राउजरमध्ये काही नवे फीचर्स आणि बदल झाले आहेत. कीबोर्ड शॉर्टकट - टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, तुम्ही कीबोर्ड शॉर्टकटचा वापर करुन अॅक्टिव्ह टॅबचा वापर करू शकता. टॅब पुन्हा नीट करण्यासाठी Ctrl+Shift+PgUp किंवा PgDn दाबावं लागेल. जर कीबोर्डमध्ये पेज अप किंवा डाउनचा पर्याय नसेल, तर तुम्ही Fn+Up किंवा डाउनचा वापर करू शकता. अँड्रॉइड डिव्हाइस - गुगलने यात अँड्रॉइड डिव्हाइससाठीही बटण दिलं आहे. याचा वापर करुन नवे टॅब, व्हॉइस सर्च, सर्च करण्यासह अनेक कामांसाठी वापर करता येतो. बटण अधिक वेळ प्रेस करुन कस्टमाइजही करता येतं.

हे वाचा -  Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स रद्द

अधिकतर युजर्स गुगल क्रोम ब्राउजरचा वापर आपल्या वर्क ईमेल, पर्सनल ईमेल, डिजीटल पेमेंट, सोशल मीडियासाठी वापरतात. ब्राउजरमध्ये आलेल्या त्रुटींमुळे युजरची पर्सनल माहिती हॅकर्स किंवा सायबर क्रिमिनल्सकडे जाऊ शकते. त्यामुळेच गुगल युजरला ब्राउजर लगेच अपडेट करण्यासाठी सांगितलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात