मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी नियमांत बदल, UIDAI ने सांगितला नवा नियम

Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी नियमांत बदल, UIDAI ने सांगितला नवा नियम

इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर क्लिक करा. ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.

इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर क्लिक करा. ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.

UIDAI ने आधारमध्ये अ‍ॅड्रेस बदलाबाबतच्या काही नियमांत बदल केले आहेत.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : तुम्हाला आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) अ‍ॅड्रेस अपडेट करायचा असल्यास, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. UIDAI ने आधारमध्ये अ‍ॅड्रेस बदलाबाबतच्या काही नियमांत बदल केले आहेत. आता अ‍ॅड्रेस प्रुफशिवाय आधारमध्ये अ‍ॅड्रेस अपडेट (Aadhaar Card Address Change Process) करता येणार नाही. UIDAI ने आधी या नियमांत सूट दिली होती. परंतु आता पुन्हा यात बदल करण्यात आले आहेत. UIDAI ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

UIDAI ने ट्विट करत नियम बदलल्यानंतर आता आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यापूर्वी डॉक्युमेंट लिस्ट चेक करावी लागेल आणि या डॉक्युमेंटच्या मदतीने आधारमध्ये पत्ता अपडेट करता येईल.

असा करा ऑनलाईन अर्ज -

- UIDAI च्या वेबसाईटवर ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.

- त्यानंतर 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

- आता ‘Send OTP’ पर्यायावर क्लिक करा.

- रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.

या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, हॅकर्स कधीच चोरी करू शकणार नाही तुमचा डेटा

- त्यानंतर ‘Login’ वर क्लिक करा.

- लॉगइन केल्यानंतर तुमचे आधार डिटेल्स स्क्रिनवर दिसतील.

- यात पत्ता अपडेट करा आणि दिलेल्या 32 कागदपत्रांपैकी एकाची स्कॅन कॉपी अपलोड करुन सबमिट करा.

Two Wheeler चालकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून या नियमांत बदल

ऑफलाईन अर्ज -

- जवळच्या आधार केंद्रात आधार कार्ड अपडेट फॉर्म भरा.

- फॉर्म जमा करा आणि वेरिफिकेशनसाठी बायोमेट्रिक्स द्या.

- कर्मचारी एक रिसिप्ट देतील, ज्यात एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल.

- या URN चा उपयोग करुन आधार अपडेशन स्टेटस ट्रॅक केलं जाऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, M aadhar card