मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Microsoft का विकतंय स्वेटर? Ugly Windows Sweater बद्दल ऐकलंय का?

Microsoft का विकतंय स्वेटर? Ugly Windows Sweater बद्दल ऐकलंय का?

ख्रिसमसच्या मुहूर्तावर मायक्रोसॉफ्टने आपला 'अग्ली विंडोज स्वेटर' (Ugly windows sweater) लॉन्च केला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा या स्वेटरची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एका संपूर्ण नवीन थीमसह हा स्वेटर तयार करण्यात आला आहे.

ख्रिसमसच्या मुहूर्तावर मायक्रोसॉफ्टने आपला 'अग्ली विंडोज स्वेटर' (Ugly windows sweater) लॉन्च केला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा या स्वेटरची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एका संपूर्ण नवीन थीमसह हा स्वेटर तयार करण्यात आला आहे.

ख्रिसमसच्या मुहूर्तावर मायक्रोसॉफ्टने आपला 'अग्ली विंडोज स्वेटर' (Ugly windows sweater) लॉन्च केला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा या स्वेटरची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एका संपूर्ण नवीन थीमसह हा स्वेटर तयार करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 4 डिसेंबर : तंत्रज्ञानविषयक विविध प्रॉडक्ट्ससाठी (Tech Products) मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. मायक्रोसॉफ्टची प्रॉडक्ट्स (Microsoft Product) वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी आता स्वेटर बाजारात आणणार आहे, असं तुम्हाला सांगितलं तर? तुम्ही म्हणाल एक टेक-कंपनी अचानक कापड उद्योगात कशी काय आली? मात्र, ही गोष्ट एकदम खरी आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर मायक्रोसॉफ्टने आपला 'अग्ली विंडोज स्वेटर' (Ugly windows sweater) लॉन्च केला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा या स्वेटरची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एका संपूर्ण नवीन थीमसह हा स्वेटर तयार करण्यात आला आहे. या वर्षीचा मायक्रोसॉफ्ट स्वेटर माइनस्वीपर (Minesweeper) गेमपासून प्रेरित होऊन तयार केलेला आहे. 'बीजीआर डॉट इन'नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    टेक जायंट मायक्रोसॉफ्टनं गेल्या वर्षीपासून एमएस पेंट थीमवर आधारित स्वेटर तयार करून ख्रिसमस स्वेटरची (Christmas sweater) फॅशन सुरू केली होती. यावर्षी त्याची दुसरी आवृत्ती आहे. गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टनं प्रत्येक स्वेटरमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग 'गर्ल्स हू कोड फाउंडेशन'ला (Girls Who Code foundation) दान केला होता. ही संस्था तरुण मुलींना कॉम्प्युटर सायन्सचं (computer science) शिक्षण देते. यावर्षी देखील एबलगेमर्स (AbleGamers) या अमेरिकन नॉन प्रॉफिट संस्थेला 1 लाख डॉलर्सची देणगी कंपनी देणार आहे. ही संस्था दिव्यांगांसाठी व्हिडीओ गेम्स तयार करण्याचं काम करते.

    आता कुणीच सिंगल राहणार नाही! फक्त बाटली उघडताच मिळेल परफेक्ट लाइफ पार्टनर

    गोल गळा असलेल्या आणि माइनस्वीपर थीमवर आधारित असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या या स्वेटरवर एक ख्रिसमस ट्री व स्नोफ्लेक्स काढण्यात आले आहेत. समोरच्या बाजूस 1990 ही तारीख आहे. 1990 मध्ये माइनस्वीपर हा क्लासिक गेम पहिल्यांदा रिलीज झाला होता. 1990सोबतच 2021 हा देखील आकडा स्वेटरवर लिहिण्यात आला आहे. स्वेटरच्या डाव्या बाजूला क्लासिक विंडोज लोगो आणि उजवीकडे क्लोज बटण आहे. मायक्रोसॉफ्टचा या वर्षीचा खास ख्रिसमस स्वेटर त्यावरच्या जास्त डिझाईनमुळे विचित्र दिसत आहे. स्मॉल, मीडियम, लार्ज आणि ट्रिपल एक्स एल साइजसह एकाच रंगामध्ये हा स्वेटर उपलब्ध आहे. सर्व साइजच्या स्वेटरसाठी ग्राहकांना 74.99 डॉलर्स म्हणजे साधारण 5600 रुपये मोजावे लागणार आहेत.

    तुम्हीही सेंट किंवा परफ्यूम वापरता? मग या गोष्टी वाचाच

    सध्या मायक्रोसॉफ्टचा हा ‘माइनस्वीपर अग्ली’ स्वेटर फक्त अमेरिकेमध्ये (United States) उपलब्ध आहे; मात्र आपण आंतरराष्ट्रीय शिपिंगही सुरू केल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. म्हणजेच तुम्ही अमेरिकेबाहेर राहत असाल तरीही तुम्हाला हा स्वेटर खरेदी करता येईल.

    First published:
    top videos

      Tags: Microsoft, Tech news