मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्हीही सेंट किंवा परफ्यूम वापरता? मग या गोष्टी वाचाच

तुम्हीही सेंट किंवा परफ्यूम वापरता? मग या गोष्टी वाचाच

परफ्यूम  (perfume)  ही आपल्या दैनंदिन आयुष्यातली गरजेची गोष्ट बनली आहे. इतरांना व स्वत:ला फ्रेश वाटण्यासाठी, चांगली छाप  (good impression)  पाडण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण परफ्यूम वापरतो.

परफ्यूम (perfume) ही आपल्या दैनंदिन आयुष्यातली गरजेची गोष्ट बनली आहे. इतरांना व स्वत:ला फ्रेश वाटण्यासाठी, चांगली छाप (good impression) पाडण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण परफ्यूम वापरतो.

परफ्यूम (perfume) ही आपल्या दैनंदिन आयुष्यातली गरजेची गोष्ट बनली आहे. इतरांना व स्वत:ला फ्रेश वाटण्यासाठी, चांगली छाप (good impression) पाडण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण परफ्यूम वापरतो.

   मुंबई, 4 डिसेंबर-    परफ्यूम   (perfume)   ही आपल्या दैनंदिन आयुष्यातली गरजेची गोष्ट बनली आहे. इतरांना व स्वत:ला फ्रेश वाटण्यासाठी, चांगली छाप   (good impression)   पाडण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण परफ्यूम वापरतो. ऑफिस, पार्टी, एखाद्या कार्यक्रमाला जाणं असो किंवा सहज मित्रांसोबत बाहेर फेरफटका मारणं असो, प्रत्येक वेळी परफ्यूम आवर्जून वापरला जातो. परफ्यूमच्या सुगंधामुळे   (Perfume fragrance)   अन्य व्यक्ती आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात, आपल्याशी गप्पा मारतात, असा अनेकांचा अनुभव असतो. आपल्या आसपास अशा अनेक व्यक्ती असतात, की ज्यांना परफ्यूचं अक्षरश: वेड असतं. त्यांच्याकडे एक से बढकर एक ब्रँडेड परफ्यूम्सचं   (Branded perfumes)   कलेक्शन असतं. काही जण तर परफ्यूमच्या फक्त वासावरून त्याचा ब्रँड आणि किंमत सांगू शकतात. परफ्यूमबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची माहिती आपल्याला नसते. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

  परफ्यूम म्हटलं, की आपल्या डोक्यात सर्वांत पहिल्यांदा फुलं येतात. फुलांचा अर्क (Flower extract) काढून परम्यूम तयार करतात, असा आपला समज आहे. त्यामुळे बहुतेक जण आपल्या आवडीच्या फुलांचा सुगंध असलेला परफ्यूम खरेदी करतात. अनेक बाटल्यांवरदेखील फुलांचीच चित्रं असतात; मात्र प्रत्येक परफ्यूम फुलांपासून तयार होत नाही! सध्या तर सिंथेटिक फ्रॅगरन्सचा (Synthetic fragrance) वापर करून परफ्यूम्स तयार केले जातात. त्यांचा सुगंध एकदम फुलांसारखाच असतो.

  अनेक परफ्यूम्समध्ये फुलांचा सुगंध असतो. काही परफ्यूम्स पूर्णपणे फुलांपासूनही बनवली जातात. परंतु, त्यांचा वास कमी होऊ नये म्हणून त्यात अनेकदा 'इंडोल' (Indole) वापरलं जातं. इंडोल हे एक सुगंधी हेटेरोसायक्लिक सेंद्रिय संयुग (aromatic heterocyclic organic compound) आहे, जे बिटुमनपासून मिळतं. फिल्टर आणि शुद्ध केलेलं बिटुमन परफ्यूममध्ये वापरलं जातं.

  (हे वाचा:आता कुणीच सिंगल राहणार नाही! फक्त बाटली उघडताच मिळेल परफेक्ट लाइफ पार्टनर)

  परफ्यूम लावल्यानंतर काही काळानं त्याचा सुगंध बदलत असल्याचं तुम्हाला कधीतरी नक्की जाणवलं असेल. अनेक परफ्यूम्स टॉप, मिडल आणि बेस नोट्स या थ्री लेयर कॉम्बिनेशनमध्ये (Three layer combination) तयार केले जातात. या तिन्ही नोट्स वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध देतात. त्यामुळं परफ्यूम लावताना त्याचा सुगंध वेगळा असतो, काही तासांनी तो बदलत जातो.

  आपल्यापैकी बहुतांश जण कपड्यांवर परफ्यूम वापरतात; पण ही पद्धत चुकीची आहे. कपड्यांवर लावलेला परफ्यूम जास्त काळ टिकून राहत नाही. उलट त्वचेवर लावलेला परफ्यूम जास्त काळ राहतो. त्यामुळे कपड्यांऐवजी अंगावर परफ्यूम वापरण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय कपड्यांवर कधी खूप जवळून परफ्यूम फवारला गेला, तर कपड्यांना डागही पडण्याची शक्यता असते.या गोष्टी परफ्यूमच्या वापरावर फारसा परिणाम करत नाहीत; मात्र खरेदी करताना त्यांची माहिती असणं नक्कीच आपल्या फायद्याचं ठरेल.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle