जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / धावत्या कारचं टायर फुटलं तर न घाबरता करा 'हे' उपाय, तुमचा जीव राहील सुरक्षित

धावत्या कारचं टायर फुटलं तर न घाबरता करा 'हे' उपाय, तुमचा जीव राहील सुरक्षित

धावत्या कारचं टायर फुटलं तर न घाबरता करा 'हे' उपाय, तुमचा जीव राहील सुरक्षित

अचानक कारचा टायर फुटण्याची अनेक कारणं असू शकतात. तुमच्या बाबतील असा प्रसंग घडला तर न घाबरता हे उपाय तातडीनं करा.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 2 नोव्हेंबर :  धावत्या कारचा टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा आपल्या वाचण्यात येतात. कार वेगात असताना अचानक अनियंत्रित होते व रस्त्यावरील दुसऱ्या वाहनाला धडकते व ती रस्त्याच्या खाली उतरल्याच्याही अनेक घटना रोज घडत असतात. अचानक कारचा टायर फुटण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु, असा प्रसंग घडला तर वाहनावर नियंत्रण मिळवणं अवघड होतं आणि भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान टायर फुटल्याची स्थिती निर्माण झाल्यास वाहनावर नियंत्रण मिळवता येणं शक्य आहे. पण यासाठी काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. कार चालवण्याच्या आधी विविध गोष्टींची पडताळणी करायला हवी. जेणेकरून अपघात टाळता येऊ शकतो. ‘या’ गोष्टींची घ्या काळजी कार चालवताना टायर फुटणं ही अनपेक्षित आणि अचानक होणारी बाब असते. अगदी काही सेकंदामध्ये ही गोष्ट घडू शकते. त्यामुळे टायर फुटल्याचं लक्षात येताच अ‍ॅक्सलरेटरवरील पाय बाजूला करावा व अचानक ब्रेक दाबू नये. ज्या बाजूचं टायर फुटलं असेल त्या बाजूलाच वेगाने कार जात असते. त्यामुळे अचानक वळण घेण्याचा प्रयत्न करू नये. स्टिअरिंग स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावा. कारचा वेग कमी झाल्यास ज्या बाजूचं टायर फुटलं आहे त्या बाजूला कारला रस्त्याच्या कडेला न्यावं. दिवाळीत मारूती सुझुकीचा धमाका! तब्बल 1.50 लाखांहून अधिक कारची विक्री कार वेगात असते तेव्हा टायरला आग लागण्याची शक्यता निर्माण होते. परंतु, अशा स्थितीत बिलकुलही घाबरू नये. वाहन थांबल्यानंतर ते बंद करावं आणि माती टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा. कार थांबल्यानंतर लगेचच टायर काढण्याचा प्रयत्न करू नये. गरम झालेल्या टायरच्या रिमला काही वेळ थंड होण्यासाठी वेळ द्यावा आणि नंतरच टायर काढावं. रिम थंड होण्यासाठी त्यावर पाणी कधीही टाकू नये. अपघात टाळण्यासाठी तपासणी करावी प्रवास सुरू करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. टायरमधील एअर प्रेशर वेळच्यावेळी तपासत राहणं अत्यंत आवश्यक असतं. लांब पल्ल्याचा प्रवास सुरू करण्याआधी टायरची स्थिती आणि त्यातील एअर प्रेशर तपासणे आवश्यक आहे. टायर अधिक जुनी झाली असतील तर ती तत्काळ बदलावी. दुरूस्ती केलेल्या टायरचा कधीही वापर करू नये. सर्व्हिसिंगच्या वेळी ब्रेक पॅड्स तपासून घ्यावे. अनइव्हन ब्रेक डिस्ट्रिब्युशनमुळे टायरच्या चुकीच्या भागाचं घर्षण होऊन ती नको तिथं झिजतात. MG लाँच करणार देशातील सर्वात स्वस्त Electric Car, कमी किमतीत दमदार फीचर्स कारची टायर ट्युबलेस असतील तर चारही एकसमानच असतील याची दक्षता घ्यायला हवी. एखादं टायर ट्युबलेस व इतर मात्र ट्युबचे असतील तर टायरचं वजन वाढू किंवा कमी होऊ शकतं. व्हील अलाइनमेंट व बॅलन्सिंग वेळच्यावेळी करणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: accident , car
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात