मुंबई, 30 ऑक्टोबर: MG Motor India ने 2023 च्या सुरुवातीला आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. ही कार एअर ईव्हीवर आधारित असेल, जी एमजी मोटरची उपकंपनी वुलिंगद्वारे विकली जात आहे. नवीन EV चे कोडनेम E230 आहे आणि ते आधीच इंडोनेशियामध्ये लॉन्च केलं गेले आहे. कंपनी भारतीय परिस्थितीनुसार इलेक्ट्रिक कारमध्ये बदल केली आहे. कंपनीनं भारतीय रस्त्यांवर कारची चाचणी सुरू केली आहे. MG Motor त्यांची नवी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार आहे. कार लाँच झाल्यावर इलेक्ट्रिक कारच्या बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. ही कार ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स (GSEV) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनी नवीन आगामी कार अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आणि ब्रँडच्या स्टाइलसह लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय कारमध्ये काही खास बदलही पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, त्यात बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम जोडली जाऊ शकते, जी भारतातील उष्णता आणि हवामान नियंत्रित करू शकते. या इलेक्ट्रिक हॅचबॅकला भारतात आल्यावर MG बॅज मिळेल. हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी धावेल OLAची पहिली Electric Car, पाहा पहिली झलक भारतातील परिस्थितीनुसार होऊ शकतात ‘हे’ बदल- एमजीच्या या नवीन परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारचे डिझाईन खूपच आकर्षक असू शकते. ही कार आकारानं खूपच लहान आहे आणि खासकरून शहराच्या भागात वापरण्यासाठी डिझाइन केलेली आहे. कारला दोन मोठे दरवाजे आहेत, जेणे करून समोरच्या सीटवर बसलेले लोक सहज आत-बाहेर जाऊ शकतात. तथापि, अशी अपेक्षा आहे की भारतात लॉन्च होणारी कार 4-डोर आणि ऑफ-रोड क्षमतेसह येईल.
कार अनेक वैशिष्ट्यांसह येईल- कारच्या फ्रंटचा विचार करता, समोरच्या बाजूला पूर्ण रुंदीचा लाइट बार आणि मागील मिररपर्यंत जाणारी क्रोम पट्टी मिळते. जागतिक बाजारपेठेत, एअर ईव्ही स्टीलच्या चाकांसह विकले जाते. तथापि, अशी अपेक्षा आहे की MG ही इलेक्ट्रिक कार भारतात अलॉय व्हील किंवा स्टाइलाइज्ड व्हीलसह लॉन्च करेल. इतर MG मॉडेल्सप्रमाणे, ही परवडणारी EV देखील वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असण्याची अपेक्षा आहे.