जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / दिवाळीत मारूती सुझुकीचा धमाका! तब्बल 1.50 लाखांहून अधिक कारची विक्री, 'ही' ठरली सर्वाधिक पसंतीची कार

दिवाळीत मारूती सुझुकीचा धमाका! तब्बल 1.50 लाखांहून अधिक कारची विक्री, 'ही' ठरली सर्वाधिक पसंतीची कार

दिवाळीत मारूती सुझुकीचा धमाका! तब्बल 1.50 लाखांहून अधिक कारची विक्री, 'ही' ठरली सर्वाधिक पसंतीची कार

दिवाळीत मारूती सुझुकीचा धमाका! तब्बल 1.50 लाखांहून अधिक कारची विक्री, 'ही' ठरली सर्वाधिक पसंतीची कार

Maruti Suzuki Cars: मारुती सुझुकीने यंदा सणासुदीच्या काळात विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली आहे. कंपनीने यावर्षी 28.77 टक्के अधिक कार विकल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 नोव्हेंबर: मारुती सुझुकीने पुन्हा एकदा सणासुदीच्या हंगामात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये विक्रीचे विक्रम मोडीत काढले आहेत. कंपनीने विक्रीत 28.77 टक्के वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे जर कार युनिट्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या तब्बल 1,40,337 कार विकल्या गेल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने केवळ 1.08 लाख युनिट्सची विक्री नोंदवली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंपनीनं विक्री करून 31 हजारांहून अधिक युनिट्सची वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे विक्रीच्या आकड्यामध्ये LCV देखील समाविष्ट केलं तर ती 1,43,250 पर्यंत पोहोचते. 2021 मध्ये ही विक्री केवळ 1,12,788 होती. दुसरीकडे कंपनीच्या देशांतर्गत आणि निर्यात विक्रीचे आकडे पाहिले, तर हा आकडा 1,67,520 वर पोहोचली आहे. तथापि कंपनीला व्हॅन विभागातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. परंतु इतर विभागांमध्ये बरीच वाढ झाली आहे. कंपनी व्हॅन श्रेणीमध्ये फक्त 8,861 Eeco ची विक्री करू शकली. 2021 मध्ये ही विक्री 10,320 युनिट्स होती. हेही वाचा:  MG लाँच करणार देशातील सर्वात स्वस्त Electric Car, कमी किमतीत दमदार फीचर्स हॅचबॅक आणि बजेट कारची प्रचंड विक्री- बजेट कार आणि हॅचबॅकवर मारुतीची नेहमीच पकड राहिली आहे आणि यावेळीही तेच गणित कायम राहिलं आहे. Alto आणि एसप्रेसो या कंपनीच्या बजेट विभागातील कारची 24,936 युनिट्स ऑक्टोबरमध्ये विकल्या गेल्या. त्याच वेळी, गेल्या वर्षी या विभागात 21,831 वाहनांची विक्री झाली होती. जर आपण हॅचबॅक सेगमेंट बघितले तर, बलिनो, सेलेरियो, इग्निस, स्विफ्ट आणि वॅगन आर या कारची 76,685 युनिट्स विकली गेली. 2021 मध्ये हा आकडा केवळ 48,690 होता. कंपनीने या विभागात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ब्रिजा आणि एर्टिगा यांनीही गाजवले वर्चस्व- Maruti Brizza आणि Ertiga सोबत S Cross आणि XL6च्या विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्ये त्यांच्या 30,971 युनिट्सची विक्री केली. त्याच वेळी, गेल्या वर्षी कंपनीने 27,081 युनिट्सची विक्री केली होती. सेडान विभागातील सियाझची विक्री 2021 मध्ये 1,069 च्या तुलनेत 1,884 युनिट्सवर होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात